Wildlife Census : वन्यजीव प्रगणनेला उजाडणार नवीन वर्ष; वनविभागाचा निर्णय

Wildlife Census
Wildlife Census esakal
Updated on

नाशिक : दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात वनविभागातर्फे करण्यात येणारी वन्यजीव प्रगणना करण्यासाठी नाशिक वनवृत्तात यंदा नवीन वर्ष उजाडणार आहे. यंदा सरासरीपेक्षा चांगला पाऊस झाल्याने वनवृत्तामध्ये मोठ्या प्रमाणात गवत असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून नाशिक, नगर वनवृत्तात होणारी वन्यजीव प्रगणना पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (New year to dawn on wildlife census Decision of Forest Department Nashik News)

Wildlife Census
Nashik : NMC आयुक्तांकडून अतिक्रमित चौकांची पाहणी

वनविभागातर्फे दरवर्षी पाणवठ्याजवळील तर चार वर्षांनी राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणातर्फे संरक्षित जंगलामधील वन्यजिवांची आणि व्याघ्र संवर्धन प्रकल्पातील वन्यजिवांची प्रगणना करण्यात येते. यामध्ये मांसभक्षी आणि तृणभक्षक प्राण्यांची गणना होते. नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने आता ही प्रगणना ट्रान्झेक्ट पद्धतीने केली जाते. त्यामुळे संपूर्ण देशातील वाघांसह इतरही प्राण्यांची नेमकी संख्या उपलब्ध होते.

जानेवारी २०१८ मध्ये अशा प्रकारची प्रथमच तंत्रज्ञानाच्या मदतीने सहा दिवसांमध्ये ही प्रगणना करण्यात आली होती. डिसेंबर २०२१ मध्ये ही प्रगणना होणार होती. परंतु ताडोबा अभयारण्यातील कोलारा परिक्षेत्रात ‘माया’ नावाच्या वाघिणीने महिला वनकर्मचाऱ्यावर हल्ला करून ठार केले होते. त्यामुळे राज्यातील वनकर्मचाऱ्यांनी सुरक्षिततेची हमी मिळेपर्यंत प्रगणना करण्यास विरोध केला होता. तब्बल एक महिन्यानंतर संरक्षण साहित्य पुरविल्यानंतर जानेवारी २०२२ मध्ये वन्यप्राणी प्रगणना झाली होती.

सध्या अभयारण्य, जंगल परिसरात गवताचे पीक बहरले आहे, यामुळे वन्यजिवांचा धोका असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून नाशिक, नगर वनवृत्तामधील प्रगणना पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन वर्षात ही प्रगणना घेण्याच्या दृष्टीने नियोजन केले असल्याने वन्यजीव प्रगणनेला नवीन वर्ष उजाडणार आहे.

Wildlife Census
Nashik : ‘Snapchat’मध्ये विशालने शोधला बग; METच्या विद्यार्थ्याची कामगिरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.