Nashik News : नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांचा Action Plan

Nashik Police Commissioner ankush shinde latest news
Nashik Police Commissioner ankush shinde latest newsesakal
Updated on

नाशिक : कोरोनाच्या दोन वर्षांनंतर निर्बंध मुक्त वातावरणात यंदा नववर्षाचे स्वागत आणि मावळत्या वर्षाला निरोप देण्यात येणार आहे. थर्टीफस्टचे वेध सर्व नागरिकांना लागले आहेत. तर नववर्ष स्वागतास गालबोट लागू नये यासाठी शहर पोलिसांनी चोख बंदोबस्ताचे नियोजन केले आहे.

शहरात दोन हजार पोलिस अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात करण्यात येणार आहे. या संदर्भात पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी उपायुक्त, सहाय्यक आयुक्त आणि पोलिस निरीक्षकांच्या बैठका घेत सूचना केल्या आहेत. (New Year Welcoming after corona police action plan ready for that Nashik News)

हेही वाचा : जोखीममुक्त व्यवहारांसाठी रिझर्व बँकेचा 'डिजिटल रुपया'

Nashik Police Commissioner ankush shinde latest news
Nashik News:...अन् दुकानावर नायलॉन मांजा बंदीचे फलक झळकले! विक्रेत्यांवर तिसरा डोळा

नववर्ष स्वागतासाठी शहर सज्ज झाले असून विविध ठिकाणी साग्रसंगीत पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये मद्याच्या नशेत काही घटना घडू नयेत, यासाठी पोलिस प्रशासन सज्ज झाले असून सुमारे २ हजार पोलिस अधिकारी, कर्मचारी शनिवारी (ता ३१) दुपारपासून सोमवारी (ता.२) पहाटेपर्यंत रस्त्यावर असतील.

परिमंडळ एक आणि दोन तसेच पोलिस ठाणे पातळीवर वेगवेगळा बंदोबस्त नेमण्यात आला आहे. ठिकठिकाणी नाकाबंदी करून वाहन चालकांनी मद्यप्राशन केले असल्यास त्याची जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय चाचणी केली जाणार आहे.

थर्टीफस्टच्या बंदोबस्तासाठी १५० पोलिस अधिकारी आणि एक हजार ५०० पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. पोलिसांच्या मदतीला गृहरक्षक जवानांसह स्ट्रायकिंग फोर्स आणि अचानक उद्भवणाऱ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्यादेखील तैनात ठेवण्यात येणार आहे.

Nashik Police Commissioner ankush shinde latest news
Jalgaon News : गृहपाठाचा बोजा नको... स्वरूपही बदलायला हवे!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()