Nashik News | दोषसिद्धीसाठी जलद तपास प्रक्रियेवर भर : नवनियुक्त अधीक्षक वालावलकर

Sharmistha Walawalkar
Sharmistha Walawalkaresakal
Updated on

नाशिक : लाचखोरीमध्ये कारवाई होऊनही संशयिताविरोधात वर्षानुवर्षे तपास आणि त्यानंतर न्यायालयीन खटला चालतो. त्यामुळे लाचखोरीच्या गुन्ह्यांमध्ये दोषसिद्धीचे प्रमाण अत्यल्प आहे. प्रलंबित तपास आणि खटले जलदगतीने निकाली लागण्यासाठी तपास प्रक्रिया जलद करण्यावर भर दिला जाईल असे लाचलुचपत प्रतिबंधक नाशिक विभागाच्या नवनियुक्त पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांनी सांगितले.

मंगळवारी (ता.२२) रात्री विभागाचा पदभार घेतल्यानंतर आज दिवसभर विभागातील अधिकाऱ्यांच्या कामकाजाचा आढाव घेत अन्य परिक्षेत्राच्या तुलनेत कामगिरी कौतुकास्पद असल्याचे श्रीमती वालावलकर यांनी सांगितले. (Newly appointed Superintendent Walawalkar statement on speedy investigation process Nashik Latest Marathi News)

गृहविभागाने राज्यातील पोलिस अधीक्षक, उपअधीक्षकांच्या बदल्या केल्या. यामध्ये नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे मावळते पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांची नागपूर लोहमार्ग तर, नाशिकच्या राज्यगुप्ता वार्ता विभागच्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांची नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षकपदी बदली करण्यात आली होती. दरम्यान, २४ तासाच श्रीमती वालावलकर हजर न होण्याचे आदेश देण्यात आले होते. तीन आठवड्यांनी कडासने यांनी मंगळवारी (ता. २२) रात्री पदभार सोडल्यानंतर रात्री उशिरा श्रीमती वालावलकर यांनी या पदावर रुजू झाल्या.

बुधवारी (ता. २३) सकाळी कार्यालयीन वेळेत नवनियुक्त अधीक्षक श्रीमती वालावलकर या हजर झाल्या आणि विभागातील अधिकाऱ्यांचा दिवसभर आढावा घेतला. नाशिकसह धुळे, जळगाव, नंदूरबार आणि अहमदनगर या जिल्ह्यातील अधिकाऱ्यांशी बैठक घेत तेथील कामकाजाचा आणि प्रलंबित कामकाजाचा आढावा घेतला. नाशिक परिक्षेत्रातील भ्रष्टाचार, अपसंपदा, सापळे या सर्व कारवाईचा आढावा घेतला.

हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

Sharmistha Walawalkar
Success Story : तरसाळीच्या पल्लवी जाधवची उत्तुंग भरारी; सहाय्यक विक्रीकर निरीक्षक पदाला गवसणी

नाशिक परिक्षेत्रात सर्वाधिक सापळे आणि कारवाई होत असल्याचे यापूर्वीही स्पष्ट झाले आहे. ही समाधानकारक बाब असून, गुन्हे दोषसिद्धीसाठी प्रयत्न करण्याच्या सूचना वालावलकर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. लाचखोरी प्रकरणी कारवाई होते परंतु, त्यानंतरचा तपास आणि न्यायालयीन प्रक्रिया यात दोषसिद्धीचे प्रमाण कमी आहे. दोषसिद्धी होऊन लाचखोरांना शिक्षा झाल्यास त्याचा परिणाम लाचखोरीला आळा बसण्यावर होऊ शकतो. त्यामुळे यावर प्रामुख्याने आपला भर असेल असेही वालावलकर यांनी सांगितले.

"आजारपणामुळे रुजू होण्यास विलंब झाला. परिक्षेत्रातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावा घेतला. प्रामुख्याने तपासाची प्रक्रिया जलदगतीने होण्यासाठी प्रयत्न करण्याचे अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. तपास जलद झाला तर न्यायालयीन प्रक्रिया जलद होऊन शिक्षेचे प्रमाण वाढू शकेल. नागरिकांनीही लाचखोरीसंदर्भात निसंकोचपणे कार्यालयाकडे संपर्क साधावा."

- शर्मिष्ठा वालावलकर, अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्र.

Sharmistha Walawalkar
Nashik News : थकबाकी भरणाऱ्यांना व्याजावर 100 टक्के सवलत; मालेगाव मनपाकडून कार्यवाही

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()