Nashik : नव्याने तयार केलेला भुयारी पुल अडचणीचा

underground bridge & rural roads
underground bridge & rural roadsesakal
Updated on

मनमाड (जि. नाशिक) : मनमाड शहर व नऊ गावांना जोडणाऱ्या मनमाड- औरंगाबाद रेल्वे मार्गावर नव्याने तयार केलेल्या भुयारी मार्गाखाली पावसाचे पाणी (Rain water) साचल्याने दळणवळण विस्कळीत होत आहे. यामुळे गावांचा संपर्कही तुटू शकतो. शहरात येण्यासाठी दुसरा रस्ताच नसल्याने ग्रामस्थांना जीव धोक्यात घालून रेल्वे रुळावरून वाहने उचलून न्यावी लागत आहे. त्यामुळे ग्रामस्थांचा प्रवास लॉक झाल्याने भुयारी मार्ग (Underground) ‘असून अडचण, नसून खोळंबा’ असाच झाला आहे. (Newly constructed underground bridge in manmad being trouble during monsoon Nashik News)

मनमाड शहरातून आनंदवाडीमार्गे वंजारवाडी, सटाणा, कऱ्ही, एकवई, माळेगाव, घडगेवाडी, निशाणवाडी, मोहेगाव, भालूर आदी गावांकडे जाण्यासाठी मनमाड- औरंगाबाद रेल्वे मार्गावरील रेल्वे फाटक बंद करण्यात येऊन भुयारी मार्ग सुरू करण्यात आला. शहरासह या नऊ गावांची वाहतूक भुयारी मार्गाने वळवली. मात्र, हा भुयारी मार्ग सुविधेऐवजी गैरसोयीचा अधिक होत आहे. गेल्या दोन- तीन वर्षांपासून ही डोकेदुखी सहन करावी लागत आहे. पावसामुळे हा भुयारी मार्ग पूर्ण पाण्याखाली गेल्याने ओसंडून वाहत असल्यामुळे या गावांतील ग्रामस्थांचे दळणवळण विस्कळीत झाले आहे.

underground bridge & rural roads
नाशिक : शिवसैनिकांनी काढली बंडखोरांची अंत्ययात्रा; पहा Photos

हा भुयारी मार्ग चिवळ असल्याने एसटी, चाऱ्याने भरलेले ट्रॅक्टर, ट्रक, खासगी बस, कांदा वाहतूक ट्रक, टेम्पो आदी वाहने जात नाही. त्यामुळे ग्रामस्थांना गैरसोईचा सामना करावा लागत आहे. तर आमचा अनेक वर्षांचा वहिवाटी रस्ता रेल्वेने खुला करावा, फाटक रस्ता सुरू करावा किंवा रेल्वे रुळावरून पूल उभारावा, अशी मागणी केली जात आहे. सदर भुयारी मार्ग सुविधांऐवजी गैरसोईचा अधिक होत आहे. पुलाखाली पाणी साचल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. ग्रामस्थांना जाण्या- येण्यास दुसरा मार्गच नाही. पुलाखाली जमा होणाऱ्‍या पाण्याची विल्हेवाट लावण्याची सुविधा कुचकामी ठरत आहे.

underground bridge & rural roads
Nashik : पावसामुळे साक्री रस्त्याची वाट

जोरदार पावसामुळे चोहोबाजुंनी येणारा पाण्याचा मोठा ओघ पुलाखाली जमा होत आहे. भुयारी मार्गाच्या बांधकाम रचनेत रेल्वेमार्गाजवळील नैसर्गिक ओढ्याचा विचार कंत्राटदार आणि रेल्वे प्रशासनाने केलेला नाही. त्यामुळे नैसर्गिक जलप्रवाहाचे पाणी पुलाखाली जमा होते. पर्यायी दुसरा मार्गही नसल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.