नाशिक : ‘ताई, आम्ही उद्या तुमच्याकडे सण घेऊन येत आहोत’ असे सांगताच पलीकडून हुंदक्यांचा हळूवार आवाज. त्यानंतर काही क्षण निरव शांतता. मग जाऊ द्या, देवाने त्यांना तेवढेच आयुष्य दिले, आता चिमुरड्यांकडे पाहण्याची जबाबदारी तुमची. त्यामुळे धीराने घ्या’ अशी प्रश्नोत्तरे ऐकल्यावर कोणाच्याही मनात विचारांची कालवाकालव होणारच. (News about Corona has caused many deaths in the same family Nashik)
सांत्वन करावे तर कोणाचे अन् कसे…
कोरोनामुळे (Coronavirus) अनेक कुटुंबातील कर्त्या पुरुषाचा मृत्यू झाल्यामुळे आज समाजातील अनेक कुटुंबापुढे कुटुंबप्रमुखच गेल्याने जगावे कसे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. याशिवाय एकाच कुटुंबातील एकापेक्षा अधिक सदस्यांनी कुटुंबाचा निरोप घेतल्याचे चित्रही आजूबाजूला फेरफटका मारल्यावर मोठ्या प्रमाणावर दिसून येते. काही ठिकाणी तर एकाच कुटुंबातील निम्म्यापेक्षा अधिक सदस्याचा मृत्यू झाल्यामुळे कधीकाळी भरलेल्या घरात आज जेमतेम दोन तीन डोकी दिसून येतात. त्यामुळे सांत्वन करावे तर कोणाचे अन् कसे, अशी परिस्थिती अनेक ठिकाणी निर्माण झाली आहे.
हिंदू धर्मियांत जवळच्या नातेवाइकांचे निधन झाल्यास सण घेऊन जाण्याची प्रथा आहे. यात संबंधित व्यक्तीच्या मृत्यूनंतर येणारा पहिला सण महत्त्वाचा असतो. यादिवशी ज्या कुटुंबातील व्यक्तीचे निधन झाले, त्यांच्याकडे जवळचे नातेवाईक मिष्टान्नाचे अर्थात गोडधोड जेवण घेऊन जातात, जेणेकरून त्यांच्याबरोबरच संबंधित कुटुंबीयही भोजन घेते, त्यामुळे नकळत दुःखाची तीव्रता कमी व्हावी हा हेतू असतो. अशी प्रथा हिंदू धर्मातील अनेक समाजांत पूर्वापार चालत आलेली आहे.
सण कोणी न्यावा?
कोरोनामुळे अनेक कुटुंबातील एकापेक्षा अधिक व्यक्तींचे निधन झाल्यामुळे असा सण कोणी व कसा न्यावा, असा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे. याशिवाय दूरचे नातलग सोडाच, सगे सोयरेही, निकटचे भाऊबंदही एकमेकांच्या घरी जाण्यास बिचकत असल्याचे वास्तव आहे. कारण कालपर्यंत दूर ठेवलेल्या कोरोनाचा स्वतःच्या घरातील प्रवेश कोणालाही परवडणारा नाही, अशी सध्याची परिस्थिती आहे. मात्र यामुळे हिंदू धर्मियांत कालपरवापर्यंत रुजलेली ‘सण’ घेऊन जाण्याची प्रथाही संपुष्टात येते की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
(News about Corona has caused many deaths in the same family Nashik)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.