निमगावला रंगणार तिरंगी लढत! आजी-माजी जिल्हा परिषद सदस्यांसह सत्ताधाऱ्यांची प्रतिष्ठा पणाला 

elections.
elections.
Updated on

निमगाव (नाशिक) : येथील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी राजकीय पक्ष व गटांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. इच्छुकांची संख्या पाहता या वेळी तीन पॅनलमध्ये कडवा मुकाबला पाहायला मिळणार आहे. निवडणुकीमुळे आजी - माजी जिल्हा परिषद सदस्यांसह ग्रामपंचायतीमध्ये सत्ता असलेल्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 

तालुक्यातील निमगावचे राजकारण जिल्ह्याला परिचित आहे. अतिशय टोकाचे व अटीतटीच्या राजकारणामुळे येथील मतदान केंद्र अतिसंवेदनशील म्हणून गणले जातात. भाऊबंदकी, वाडे, नातेगोते व राजकीय पक्षांच्या गराड्यात निवडणूक नेहमीच चुरशीची होते. या वेळीही नेते व कार्यकर्त्यांनी मोर्चेबांधणी केली असून, निवडणुकीत तीन पॅनलमध्ये मुकाबला होणे अपेक्षित आहे. पॅनलनिर्मितीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. तीन पॅनल व अपक्ष म्हणून निवडणूक लढविणाऱ्या हौशा-नवशांमुळे मतदारराजांची चांगलीच चंगळ होणार आहे. पॅनलनिर्मिती व उमेदवार ठरविताना नातेगोते व आर्थिक परिस्थिती सक्षम असणाऱ्यांना प्राधान्य मिळण्याची शक्यता आहे. 
विद्यमान जिल्हा परिषद सदस्य गावविकासाच्या योजना अमलात

निकालाची उत्सुकता

आणण्यासाठी ग्रामपंचायतीवर आपले समर्थक निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष समर्थकांची अनेक वर्षे ग्रामपंचायतीवर सत्ता होती. पुन्हा वर्चस्वसाठी त्यांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. सध्या ग्रामपंचायतीवर सत्ताधारी गटाला सत्ता टिकवून ठेवण्याचे आव्हान आहे. पाच वर्षांच्या काळात तीन सरपंच झाले. काहींनी गट बदलले, याचा परिणाम गावविकासावर झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे जागृत झालेला मतदारराजा कोणाच्या बाजूने कल देतो, हे निकालातच समजेल. 

स्थलांतरित मतदारांवर लक्ष 

गावातील जवळपास पाचशेपेक्षा अधिक मतदार मालेगाव, नाशिक आदी ठिकाणी रोजीरोटीसाठी स्थलांतरित झाले आहेत. अनेकजण नोकरी व व्यवसायानिमित्त बाहेरगावी राहत असले तरी त्यांचे मतदारयाद्यांमध्ये नाव आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानाला ते हमखास गावी येतात. या मतदारांवर तिन्ही पॅनल लक्ष केंद्रित करणार आहेत. स्थलांतरित मतदारांना आकर्षित करण्यासाठी आतापासूनच त्यांच्याशी संपर्क साधला जात आहे. ऐन कडाक्याच्या थंडीत निमगावमधील राजकीय वातावरण अर्ज दाखल करण्यापूर्वीच गरम होत आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()