अनलॉकमुळे नाशिकच्या औद्योगिक जगतात आनंदाचे वातावरण

Industry
Industrygoogle
Updated on
Summary

सोमवार (ता.७) पासून अनलॉक जाहीर झाल्याने औद्योगिक क्षेत्रातील मालक, व्यवस्थापक व कामगारांनी आनंद व्यक्त करत सकारात्मक वातावरण पाहायला मिळाले.

सातपूर (जि. नाशिक) : गेल्या महिनाभरापासून औद्योगिक क्षेत्रासह कामगार लोकवस्ती कोरोनामुळे (Coronavirus) लॉक होती. काही दिवसापूर्वी लॉकडाउन (Lockdown) शिथिल केले असले तरी विविध कारणांनी कंपन्यांमध्ये कामगारांना कामावर बोलविले जात नव्हते. सोमवार (ता.७) पासून अनलॉक जाहीर झाल्याने औद्योगिक क्षेत्रातील मालक, व्यवस्थापक व कामगारांनी आनंद व्यक्त करत सकारात्मक वातावरण पाहायला मिळाले. (news about industries in nashik after the lockdown rules were relaxed)



कोरोनाच्या पहिल्या लाटेत अनेक छोट्या- मोठ्या कंपन्या आर्थिक संकटात आल्या. या संकटातून मार्ग काढण्यासाठी बॉश, महिंद्रा, सीएट, ईपिरॉक, सिमेंससह अनेक कंपन्यांमध्ये व्यवस्थापन बरोबर कायम कामगारांची मोठ्या प्रमाणावर कपात केली गेली. यामुळे हजारो कामगार बेरोजगार झाले. अशा परिस्थितीत कंपन्यांनी उत्पादनाला चांगलीच गती दिली होती. परंतु, मार्चमध्ये दुसरी लाट आली आणि औद्योगिक क्षेत्राचे कंबरडेच मोडले. पुन्हा औद्योगिक वसाहतीचे उत्पादन बंद झाले होते. हजारो लघुउद्योगामधील परप्रांतीयासह महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगरसह विविध कानाकोपऱ्यातून आलेल्या कामगार भीतीपोटी गावाकडे निघून गेले आहेत. काही दिवसापूर्वी निर्बंध शिथिल केले, परंतु जिल्हाबंदी, निर्बंध कायम होते. त्यामुळे पूर्ण क्षमेतेने उद्योग सुरू झाले नाही. सोमवारपासून जिल्हासह इतर विभागातील अनलॉक जाहीर झाल्याने लवकरच परिस्थिती पूर्वपदावर येईल, अशी सकारात्मक अशा बाळगून नाशिकच्या औद्योगिक क्षेत्रासह कामगार लोकवस्तीत आनंदाचे वातावरण तयार झाले आहे.

Industry
आजपासून नाशिकमध्ये निर्बंध शिथील; चाकरमानी निघाले कामाला!;पाहा व्हिडिओ


कोरोनामुळे काही दिवस औद्योगिक वसाहतीत निर्बंध घातले होते. ते टप्याटप्याने उठवले. आजमितीला सुरक्षेसाठी सर्व उपाययोजना करीत सर्व प्रकारचे उद्योग सुरू झाले आहेत. येणाऱ्या काळात औद्योगिक आर्थिक चक्राला अधिक गती मिळेल, असा विश्‍वास आहे.
-नितीन गवळी, प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी.

संकट मंदीचे असो की कोरोनाचे, नाशिक औद्योगिक क्षेत्रातील मान्यवर, व्यवस्थापक, तसेच कामगार बंधूंनी नेहमीच एकत्र येत या संकटावर मात केली आहे. याच सकारात्मक विचाराने या दुसऱ्या लाटेनंतर अल्पावधीत औद्योगिक वसाहती अधिक जोमाने गजबजून गेलेल्या दिसतील.
- गणेश कोठावदे, माजी अध्यक्ष, सीआयआय.


(news about industries in nashik after the lockdown rules were relaxed)

Industry
राज्य सरकार मराठा समाजात फूट पाडतेय - राधाकृष्ण विखे-पाटील

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()