"आधी लढाई जीवन मरणाची, मग हक्क अधिकारांची" - खासदार संभाजीराजे भोसले

आपण कोरोनासारख्या महामारीशी लढत आहोत. आपण प्रत्येकाने आपला जवळचा कुणीतरी गमावला आहे. जीवन मरणाची ही लढाई जिंकणे हे आपले या क्षणाचे पहिले काम आहे.
Sambhaji Raje Bhosale
Sambhaji Raje BhosaleNashik
Updated on

सिडको (नाशिक) : आरक्षण (Maratha Reservation) मिळवणे हा मराठा समाजाचा प्राधान्यक्रम आहेच .सकल समाजाच्या आरक्षण संदर्भातील भावनांशी मी शतप्रतिशत सहमत आहे, ज्या भावना समाजाच्या भावना त्याच माझ्याही आहेत. हा अधिकार समाजाला मिळवून देण्यासाठी मी अखेरच्या क्षणापर्यंत कटीबध्द आहेच, तथापी आज आपण कोरोनासारख्या (Coronavirus) महामारीशी लढत आहोत. आपण प्रत्येकाने आपला जवळचा कुणीतरी गमावला आहे. जीवन मरणाची ही लढाई जिंकणे हे आपले या क्षणाचे पहिले काम आहे. माणसं जगली तर मिळालेले आरक्षण सार्थ ठरेल. ही लढाई जिंकल्यानंतर आरक्षणासाठी मी स्वतः समाजासोबत रस्त्यावर उतरेल. अशा सुटसुटीत शब्दात छञपती खासदार संभाजी राजे भोसले (MP Sambhaji Raje Bhosale) यांनी आरक्षण मुद्यावर सध्या रस्त्यावरचे आंदोलन सामुहिक आरोग्यासाठी धोक्याची घंटा ठरेल असा इशारा दिला. (News about Statement of MP Sambhaji Raje Bhosale on Maratha reservation)

छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या वडीलांचे निधन झाल्यानंतर गायकर कुटूंबांचे सांत्वन करण्यासाठी छञपती खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती (sambhajiraje chhatrapati) नाशिक दौऱ्यावर आले होते. तेव्हा पञकारांनी आरक्षण मुद्यावर छेडण्याचा प्रयत्न केला यावर त्यांनी आपली भुमिका स्पष्ट केली.

Sambhaji Raje Bhosale
तौक्ते चक्रीवादळानंतर नाशिक जिल्ह्यातील वीजपुरवठा सुरळीत

"नाशिक जिल्ह्यातील आजचा दौरा कुठलाही राजकीय दृष्ट्या नसून गायकर कुटुंबातील सदस्यांच्या दुःखात सहभागी होण्यासाठी आलो असून त्यांच्या आयुष्यातील पडलेली ही पोकळी भरून काढण्यासाठी नेहमीच त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी सदैव उभा राहून कुटुंबाच्या अडचणी सोडवण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असेल. त्याच बरोबर शिवा तेलंग यांच्या मातोश्री ज्ञानेश्वर थोरात यांचे भाऊ मराठा क्रांती मोर्चा चे सन्माननीय निलेश गायके सामाजिक कार्यकर्ते रोशन घाटे यांचेही दुःखद निधन या काळात झाले त्यांच्याही कुटुंबांसोबत मी सदैव पाठीराखा म्हणून उभा राहील"

-खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती

तुषार जगताप यांना सुखद धक्का

छञपती खा. संभाजी राजे भोसले गायकर कुटूंबांचे सांत्वन करण्यासाठी आले असता शिवतिर्थ प्रतिष्ठानतर्फे रूग्णवाहिका लोकार्पण करण्यात आली. छञपतींच्या हस्ते हे लोकार्पण निश्चित होते. हा करण्याचा मान आरोग्यदूत तुषार जगताप यांना दिला. गेली दहा पंधरा वर्षापासून तुषार जगताप समाजाच्या आरोग्यासाठी काम करीत आहेत. विशेषतः कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आॕक्सीजनचा तुटवडा भासत असल्याने श्वास कोंडलेल्या अत्यवस्थ रूग्णांसाठी युवराज संभाजी राजे छञपती वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून आॕक्सीजन सिलेंडर निःशुल्क उपलब्ध करून देत शेकडो रूग्णांचे प्राण वाचवले. म्हणून रूग्णवाहिका या जीवन वाहिनीचे लोकार्पणही या आरोग्य दुताच्या हस्ते व्हावे अशी इच्छा व्यक्त करून खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती (sambhajiraje chhatrapati) यांनी रिबन कापून श्रीफळ वाढविण्याचा मान तुषार जगताप यांना देत सुखद धक्का दिला.

यावेळी कुटुंबियां समवेत विलास पांगरकर,प्रमोद जाधव,तुषार जगताप,नगरसेवक योगेश शेवरे,विक्रम नागरे,बाळासाहेब लांबे, बाळा निगळ, नवनाथ शिंदे, भारत पिंगळे, प्रितेश पाटील, गणपत जगताप, तुषार पाटील, निलेश शेजुळ, सोनू काळे, अविनाश गोसावी उपस्थित होते.

छोट्या छोट्या गोष्टीची दखल घेऊन रयतेच्या भावना जपणारा राजा खरा लोककल्याणकारी राजा म्हणून ओळखला जातो. आज रूग्णवाहिकेचे लोकार्पण करण्याची राजेंनी मला दिलेली संधी ही माझ्यासारख्या सामान्य मावळ्याच्या पाठीवर राजाने मारलेली अविस्मरणीय थाप आहे. या शाबासकीतून प्रेरणा घेत सामाजिक काम सातत्याने सुरू राहील.

- तुषार जगताप ,आरोग्यदूत नाशिक

(News about Statement of MP Sambhaji Raje Bhosale on Maratha reservation)

Sambhaji Raje Bhosale
मराठा आरक्षण प्रश्नी भूमिकेबाबत काय म्हणाले संभाजाराजे ?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()