वेस्‍ट नाही; पण कोरोनाचे लसीकरण बेस्‍टही नाहीच!

लसीकरण झालेले कोरोनापासून सुरक्षित आहेत का? या प्रश्‍नाचे उत्तर नाही असण्याची अनेक कारणे असतील
corona vaccine
corona vaccineMedia Gallery
Updated on

नाशिक : जिल्ह्यात आजपर्यंत पहिला व दुसरा डोस मिळून सात लाख ८६ हजार ९४४ इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोना प्रतिबंधक लसीकरण (Coronavirus Vaccination) झाले आहे. पण लसीकरण झालेले कोरोनापासून सुरक्षित आहेत का? या प्रश्‍नाचे उत्तर नाही असण्याची अनेक कारणे असतील. परंतु अक्षम्‍य कारण म्‍हणजे लसीकरण केंद्रांवर (Vaccination Centers) आवश्‍यक नियमावलीकडे होणारे दुर्लक्ष. कुठे आइसबॉक्‍समध्ये पाणी टाकत व्‍हायल ठेवली जातेय. तर दुर्गम भागात फ्रिजर व्‍यवस्‍था नसल्‍याने आवश्‍यक वातावरणात लशीचे (Vaccine) जतन होत नाही. खासगी रुग्‍णालयांची सुसज्‍ज यंत्रणा असताना केवळ शासकीय यंत्रणेद्वारे लसीकरणाचा अट्टहास लशीची क्षमता प्रभावित करत असल्‍याचे जाणकारांचे म्‍हणणे आहे.

यापूर्वी चांगले काम करणाऱ्या शासकीय व खासगी लसीकरण केंद्रांना लशींचा साठा उपलब्‍ध करून दिला जात होता. परंतु लसीकरण मोहिमेची व्‍याप्ती वाढविताना वाटप प्रक्रियेतही बदल करण्यात आले आहेत. केंद्र शासनाकडून लशींचा साठा उपलब्‍ध होत नसताना दुसरीकडे गेल्‍या १ मेपासून १८ ते ४४ वयोगटातील व्‍यक्‍तींसाठी लसीकरण मोहीम विस्‍तारित केली आहे. अशात बहुतांश खासगी रुग्‍णालयांतील लसीकरण केंद्र लशींच्‍या पुरवठ्याअभावी बंद करावी लागली आहेत. दुसरीकडे शासकीय यंत्रणेमार्फत लसीकरण मोहीम राबविताना त्यातील अनेक त्रुटी समोर येत आहेत. गेल्या महिन्‍यापर्यंत सुरळीत चाललेली लसीकरण मोहीम नंतर मात्र भरकटली आहे. खासगी रुग्‍णालयांमध्ये अद्ययावत यंत्रणा असताना त्‍याचा वापर करून घेण्याऐवजी अट्टहास का केला जात आहे, या प्रश्‍नाचा विचार होणे आवश्‍यक आहे.

corona vaccine
म्‍युकरमायकोसिसकरिता लागणाऱ्या इंजेक्शनचा काळा बाजार! नातेवाइकांची होतेय दमछाक

अशा राहताहेत त्रुटी…

लसीकरणासाठी व्‍हायल दोन ते आठ डिग्री सेल्सिअस तापमानात जतन करणे आवश्‍यक असते. तसेच लसीकरण केंद्रावर एकदा व्‍हायल खुली केल्‍यावर चार तासांत दहा डोसकरिता ती वापरावी लागते. परंतु ग्रामीण भागात वीजपुरवठ्याची समस्‍या, फ्रिजर यंत्रणा उपलब्‍ध नसल्‍याचे अनेक ठिकाणी बघायला मिळत आहे. काही वेळा बर्फ उपलब्‍ध नसल्‍याने आइस बॉक्‍समध्ये पाणी टाकून काम चालविले जात असल्‍याचेही निदर्शनास येत आहे. बहुतांश ठिकाणी टीएलआर फ्रीजचा वापर केल्‍याने, अशा फ्रीजमध्ये कुठल्‍याही कोपऱ्यात सारखेच तापमान राखणे शक्‍य होते. परंतु बहुतांश शासकीय रुग्‍णालयांमध्ये ही व्‍यवस्‍था नसल्‍याची स्‍थिती आहे.

नुकसान कमी, पण लशींचा प्रभाव कितपत

निर्धारित वेळेत व्‍हायल संपत असल्‍याने लशीचे कागदोपत्री नुकसान होताना दिसत नाही. दुसरीकडे व्यवस्‍थितरिरीत्‍या हाताळणी जात नसल्‍याने, अशी लशी लाभार्थ्यांकरिता कितपत प्रभावी ठरतील, हे सांगणेही कठीण ठरते. बऱ्याच वेळा विशेषतः ग्रामीण, दुर्गम भागात अकुशल मनुष्यबळामुळेही लसीकरणाच्‍या क्षमता कमी होत असल्‍याचे दृश्‍य आहे. काही ठिकाणी मात्र संपूर्ण सावधगिरी बाळगून लसीकरण केले जात आहे.

corona vaccine
कोरोना काळात पालक गमावलेल्‍या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मिळणार पाठबळ

गेल्या महिन्‍यापर्यंत अधिकाऱ्यांकडून लशींचे सुरळीत वाटप केल्‍याने आम्‍ही आजवर सतरा हजारांहून अधिक नागरिकांचे लसीकरण केले. परंतु आता पैसे भरूनही लशींच्‍या साठ्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. प्रभावी लसीकरणासाठी खासगी रुग्‍णालयांची चांगली मदत होऊ शकते, याचा शासन स्‍तरावर विचार व्‍हायला हवा.

- डॉ. लक्ष्मीकांत पाठक, सीईओ, नामको हॉस्‍पिटल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()