नाशिक : कोरोना विषाणू संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी १२ ते २३ मेपर्यंत लॉकडाउनचे कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या कालावधीत अत्यावश्यक सेवेत वर्तमानपत्रांचा समावेश आहे. त्यामुळे वृतपत्राची छपाई सुरूच राहणार आहे. तसेच आपल्या घरापर्यंत वृत्तपत्रांचे अखंडपणे वितरणही सुरू राहणार आहे. कोरोना काळातील विश्वासार्ह माहिती घरबसल्या वृतपत्रातून मिळत राहणार आहे. (Newspaper printing and distribution will continue during the lockdown in the district)
निर्बंधांच्या काळात अफवाचे पीक येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये. कडक निर्बंधाच्या काळात प्रत्येकाने घरी राहून कोरोना विषाणूचा संसर्ग होणार नाही, याची काळजी घ्यावी. कामानिमित्त घराबाहेर यायचे झाल्यास मास्क वापरा, हात स्वच्छ धुवावेत. शारीरिक अंतर राहील, याची काळजी प्रत्येकाने घ्यावी. आता कसल्याही परिस्थितीत कोरोना विषाणूची साखळी आपल्याला तोडायची आहे. त्यादृष्टीने घालण्यात आलेले कडक निर्बंध प्रत्येकाने पाळावेत. त्याचवेळी वृतपत्रातून स्थानिकपासून जागतिक स्तरावरील माहिती वाचत राहावी. वर्तमानपत्रांपासून कोरोनाचा कसलाही धोका नाही हे जागतिक आरोग्य संघटनेप्रमाणेच राज्य, केंद्र सरकार आणि जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. छपाई झालेली वृत्तपत्रे वाचकांपर्यंत घरोघरी वितरकांच्या माध्यमातून पोचवण्यात येणार आहेत.
विक्रेत्यांना करावे सहकार्य
कोरोनाकाळातील विश्वासार्ह माहिती वृतपत्राच्या माध्यमातून सुरक्षितपणे आपल्या घरापर्यंत विक्रेत्यांच्या माध्यमातून पोचणार आहे. त्यामुळे शहर आणि जिल्हावासीयांनी वृतपत्र विक्रेत्यांना सहकार्य करावे. वर्तमानपत्राचे बिल वेळेत विक्रेत्यांना देऊन सहकार्य करावे. आपण वेळेत बिल दिल्याने विक्रेत्यांना सहाय्य होणार आहे.
वर्तमानपत्र छपाईवेळी सॅनिटाइज केले जाते. त्याचवेळी विक्रेते वृतपत्र आपल्या घरापर्यंत पोचवताना कोरोना प्रतिबंधाची सगळ्या प्रकारची काळजी घेतात. वृत्तपत्राच्या माध्यमातून खरी माहिती वाचकांपर्यंत आम्ही पोचवतो. त्यात स्थानिकपासून ते जागतिकस्तरावरच्या माहितीचा समावेश असतो.
-चंद्रकांत पवार, अध्यक्ष, नाशिक शहर वृत्तपत्र विक्रेता संघटना
वाचकांच्या घरापर्यंत वृत्तपत्र पोचवत असताना विक्रेते सगळ्या प्रकारची काळजी घेताहेत. त्याचवेळी वेळेत वर्तमानपत्र आम्ही घरोघरी पोचवतो. लॉकडाऊनच्या कडक निर्बंधाच्या काळातही वेळेत आणि सगळ्या प्रकारची काळजी घेऊन आम्ही वेळेत वृतपत्र पोचवणार आहोत.
-दत्तात्रय ठाकरे, अध्यक्ष, सिडको वृतपत्र विक्रेता संघटना
आमच्या घरातील कार्य असले तरीही, ऊन-वारा-पाऊस याची तमा न बाळगता विक्रेते वृतपत्र घरोघरी पोचवण्याचे काम करतात. आताही कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात आम्ही सर्वप्रकारची काळजी घेऊन वृत्तपत्र पोचवण्याची सेवा अखंडपणे सुरू ठेवणार आहोत. आमच्या दृष्टीने वाचकांची काळजी ही प्राधान्य आहे.
-महेश कुलथे, अध्यक्ष, नाशिक रोड वृतपत्र विक्रेता संघटना
कोरोना विषाणूचा संसर्ग फैलाव होणार नाही, याची आम्ही पूर्णत: काळजी घेत आहोत. पूर्वी वृतपत्रांच्या वितरणासाठी विक्रेते एकत्र बसत असत. आता वृतपत्रे घेऊन आम्ही थेट घर गाठतो. मग वितरणाची व्यवस्था करतो. कोरोनाविषयक घेण्यात येत असलेली सुरक्षेची काळजी आम्ही वाचकांना भेटून सांगितलेली आहे. त्यामुळे वाचक समाधानी आहेत.
-विनोद कोर, अध्यक्ष, सातपूर वृतपत्र विक्रेता संघटना
(Newspaper printing and distribution will continue during the lockdown in the district)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.