Sinnar-Shirdi Fire Accident: शिर्डी महामार्गावर लागलेल्या 'त्या' आगी नंतर NHAI प्रशासन सतर्क!

Fire Accident
Fire Accidentesakal
Updated on

Nashik News : अज्ञात टँकर चालकाकडून रस्त्याच्या कडेला ज्वालाग्रही रसायन पोचल्यानंतर सिन्नर शिर्डी राष्ट्रीय महामार्गावर रविवारी सायंकाळी आग लागण्याची घटना घडली होती.

या घटनेची राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण अर्थात 'न्हाई' कडून दखल घेण्यात आली आहे. येत्या काळात अशा प्रकारची आगळीक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत न्हाई कडून देण्यात आले आहेत. (HAI administration on alert after fire on Sinnar Shirdi Fire Accident nashik news)

ज्वालाग्रही रासायनिक पदार्थ रस्त्याच्या कडेला असलेल्या नालीमध्ये ओतण्याचा प्रकार सिन्नर शिर्डी महामार्गावर मागील काही महिन्यांपासून घडत आहे. ऑइल सदृश्य असणारा हा द्रव पदार्थ महामार्ग लगतच्या विहिरींमध्ये उतरून पाणी प्रदूषित होण्याचा प्रकार खोपडी येथील महानुभाव दत्त मंदिर परिसरात निदर्शनास आला आहे.

खोपडीपासून ते देवपूर फाटा पांगरी पर्यंत आणि अलीकडच्या काही दिवसांमध्ये वावी पांगरी दरम्यान रात्री च्यावेळी प्रदूषणकारी रासायनिक द्रव पदार्थ ओतून देण्याचे प्रकार घडले आहेत. रविवारी वावी शिवारात शिंदे वस्ती जवळ या द्रव पदार्थाला आग लागण्याची घटना घडली होती.

त्यातून धुराचे प्रचंड लोळ आणि ज्वाला निर्माण झाल्या होत्या. या प्रकाराबाबत स्थानिक रहिवाशांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि पोलीस यंत्रणेने संबंधित अज्ञात टँकर चालकांवर कारवाई करण्याची मागणी केली.

दरम्यान, या प्रकाराबद्दल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून दखल घेण्यात आली असून येत्या काळात अशा प्रकारे अपायकारक रासायनिक द्रव पदार्थ रस्त्याच्या कडेला ओतणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात आले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Fire Accident
Nashik Fire Accident : सिन्नर-शिर्डी महामार्गावर आगीचा मोठा भडका; रस्त्याच्या कडेला ज्वालाग्रही रसायने ओतण्याचा उपद्व्याप

शिर्डी महामार्गावर ठिकठिकाणी स्पाय कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले आहेत. या कॅमेऱ्याच्या फुटेजची तपासणी करण्यात येईल. तसेच टोल प्लाझा वरील गस्तीपथकाला सूचना देऊन अशा प्रकारची आगळीक करणाऱ्यांवर नियंत्रण करण्यास सांगितले जाईल.

वारंवार घडणाऱ्या अशा घटनांबद्दल पोलिसांना देखील पत्र दिले जाणार आहे अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उप कार्यकारी अभियंता दिलीप पाटील यांनी दैनिक सकाळशी बोलताना दिली.

"रस्त्याच्या कडेला प्रदूषणकारी रासायनिक द्रव पदार्थ ओतण्याच्या प्रकाराबद्दल स्थानिक शेतकऱ्यांनी जागरूकता बाळगावी. अशा प्रकारे एखादा संशयित टँकर आढळून आल्यास त्याबद्दल स्थानिक पातळीवर तसेच पोलिसांना माहिती द्यावी म्हणजे ही आगळीक करणाऱ्यांना रंगेहात पकडता येईल. असे प्रकार वारंवार घडत राहिले तर प्रदूषणाचा मोठा धोका सर्वांनाच सहन करावा लागणार आहे." - दिलीप पाटील (राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण)

Fire Accident
ZP School Corruption : ZPतही शिक्षणाचा काळा बाजार; टप्प्याटप्प्यावर फायलींवर ठेवावे लागते वजन...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.