वणी : दुर्गम भागातील तरुण, तरुणी व मॅरेथॉन धावपटूंच्या क्रीडा कौशल्याला संधी देणे व आरोग्यासह पर्यावरण जनजागृतीसाठी श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट, सप्तशृंग गड व नाशिक रनर्सतर्फे झालेल्या सातव्या सप्तशृंगी हिल मॅरेथॉन स्पर्धला मोठा प्रतिसाद मिळाला.
स्पर्धेत सुमारे हजार स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. विविध स्पर्धकांनी हजेरी लावल्याने ही स्पर्धा लक्षवेधक ठरली. (Nikam Kasbe first in Saptashrungi Hill Marathon Colored by presence of various contestants nashik)
नांदुरी ते सप्तशृंगगड या घाट रस्त्यावर रविवारी (ता. ३) झालेल्या सप्तश्रृंगी हिल मॅरेथॉन स्पर्धेत वयोगट १८ ते ४०, ४१ ते ५०, ५१ च्या वरील खेळाडूंनी सहभाग घेतला.
माणिक निकम यांनी २१ किलोमीटर अंतर १ तास ५३ मिनिटे ३५ सेकंदांत पार करत प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकावले, तर महिलांमध्ये साक्षी कसबे यांनी २१ किलोमीटर अंतर १ तास ४० मिनिटे २० सेकंदांत, तर दीपक शिरसाठ १० किलोमीटर अंतर ३३ मिनिटे ३१ सेकंदांत पार करत प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकावले.
रिंकी पावरा हिने १० किलोमीटर अंतर ४० मिनिटे १३ सेकंदांत पूर्ण केले. यासह जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधत श्रीमती माई लेले विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. १२, १४ व १६ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी टॅलेंट हंट स्पर्धा झाली. स्पर्धेत सुमारे एक हजार स्पर्धकांनी सहभाग नोंदविला.
विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष तथा जिल्हा व सत्र न्यायाधीश बी. व्ही. वाघ, कळवण येथील न्यायाधीश मुटकुळे, एशियन पॅरा ऑलंपीक सुवर्णपदक विजेता दिलीप गावित, क्रीडा प्रशिक्षक वैजनाथ काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी सहाला सप्तशृंगी हिल मॅरेथॉन स्पर्धेला प्रारंभ झाला.
नाशिकमधील सर्व आर्यन मॅनचा सत्कार करण्यात आला. सप्तशृंग गडाचे सरपंच रमेश पवार, नांदुरीचे सरपंच सुभाष राऊत, पोलिस उपअधीक्षक संजय बांबळे, पोलिस निरीक्षक टेंभेकर, उपनिरीक्षक बबन पाटोळे, रावसाहेब शिंदे, विश्वस्त ॲड. ललित निकम, भूषणराज तळेकर, डॉ. प्रशांत देवरे व मनज्योत पाटील, रोप-वे प्रकल्प व्यवस्थापक राजीव लुंबा, नाशिक रनर्सचे अध्यक्ष एन. टी. वाघ, सुनील देव, डॉ. धनंजय डुबेरकर, सुजीत नायर, नरेन अय्यर, विनोद गोरे, सिद्धांत सोनार, नाशिक सायकलिस्टचे अध्यक्ष किशोर काळे, डॉ. मनीषा रौंदळ व इतर सदस्य उपस्थित होते.
टकाटक एफएमचे प्रथम उमळकर यांनी सूत्रसंचालन केले. उपक्रमासाठी विश्वस्त संस्थेचे कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे, नानाजी काकळीज, प्रशांत निकम, मुरली गावित, राजेंद्र पवार, संतोष चव्हाण, प्रमोद देशमुख, राजेंद्र पवार, मुरलीधर गायकवाड, शरद सिशोदे व कर्मचारी जॉन भालेकर, आपत्ती व्यवस्थापन व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.