सातपूर : निमाचे नूतन अध्यक्ष धनंजय बेळे आणि त्यांच्या टीमने गुरुवारी (ता. १२) आपल्या पदाची सूत्रे विधिवत स्वीकारली. या वेळी ब्रह्मवृंदांनी मंत्रोच्चार केला. सूत्रे स्वीकारल्यानंतर बेळे यांच्यावर अभिनंदनाचा एकच वर्षाव झाला.
निमाला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी तसेच विस्कटलेली आर्थिक घडी सुरळीत करून कामकाजात सुसूत्रता आणणार, असे अभिवचन बेळे यांनी बोलताना दिले. (Nima finances will be smooth Dhananjaya Bele Duly accepted presidency Nashik News)
सभासदांनी आपल्यावर जो विश्वास टाकला त्याला कदापि तडा जाऊ देणार नाही. धर्मादाय आयुक्तांनी जी मार्गदर्शक तत्त्वे घालून दिली, त्याची पूर्तता करून निमाचा कारभार करू. एअर कनेक्टिव्हिटी पूर्ववत करण्यासाठी आपण आपले सर्वस्व पणास लावू.
सातपूर, अंबडसह जिल्ह्यातील सर्व औद्योगिक वसाहतींच्या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष देऊन उद्योजकांचे घरपट्टीसह जे प्रलंबित प्रश्न आहेत ते सोडविण्याकडे आपला विशेष कल राहील, असेही बेळे यांनी या वेळी नमूद केले.
गुंतवणूक करताना ‘हम होंगे कामयाब, पूरा है विश्वास!’...पण कसे? घ्या जाणून
पदभार स्वीकारताना निमाचे माजी अध्यक्ष विवेक गोगटे, डी. जी. जोशी, आयमाचे अध्यक्ष निखिल पांचाळ, सरचिटणीस ललित बूब, उपाध्यक्ष सुदर्शन डोंगरे, राजेंद्र पानसरे, सहसचिव गोविंद झा, योगिता आहेर, कोषाध्यक्ष राजेंद्र कोठावदे, माजी अध्यक्ष राजेंद्र अहिरे, विराज गडकरी, जयंत पगार, प्रेरणा बेळे, हर्षद बेळे, महाराष्ट्र कॉमर्स ऑफ चेंबर्सचे पदाधिकारी संतोष मंडलेचा, सुधाकर देशमुख, आशिष नहार, मिलिंद राजपूत, वैभव जोशी, रवींद्र झोपे, देवेंद्र राणे, जगदीश पाटील, लघु भारतीचे मिलिंद देशपांडे, रोटरी क्लब अंबडचे विजय जोशी, वैभव चावक, हेमंत खोंड, कैलास सोनवणे, प्रा. ललित पगार, रोटरी क्लब ३०३० चे नूतन प्रांतपाल ज्ञानेश्वर शेवाळे आदींसह उद्योजक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.