निमगाव परिसर ठरतोय दुधाचे माहेरघर; तरूणांना रोजगारासाठी चालना

Cow
Cowesakal
Updated on

निमगाव (जि. नाशिक) : गाव व परिसरात शेतीला जोडव्यवसाय म्हणून दुग्धव्यवसाय यशस्वी ठरत आहे. परिसरात पशुधन व दुधाच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. नगर, लोणी, प्रवरानगर, राहुरी येथून संकरित गायी व म्हशी आणल्या जात आहेत. निमगाव व परिसर दुभत्या जनावरांच्या खरेदी-विक्रीचे केंद्र झाले आहे. विशेष म्हणजे तरुण शेतकरी दुग्धव्यवसायाकडे वळाले असून, यातून शेकडो मजुरांना रोजगार उपलब्ध झाला आहे.

पशुधनात लक्षणीय वाढ

लोणी, राहुरी येथे जनावरांचा मोठा बाजार भरतो. शेतकऱ्यांना एवढ्या दूर जाणे शक्य होत नाही. त्यामुळे व्यापारी येथे गायी-म्हशी विक्रीसाठी आणतात. ४० हजारांपासून ते सव्वा लाखापर्यंत गायी-म्हशी मिळत आहेत. कांचन, एचएफ, जाफर, गीर, टापरिया या जातीच्या दूध देणाऱ्या गायी-म्हशींना मागणी आहे. निमगाव परिसरात ढगफुटीसारखा पाऊस झाल्याने हातात आलेले पीक वाया गेले. पुरेसा चारा उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकरी पशुधनवाढीकडे वळले आहेत. हा भाग कायम दुष्काळी म्हणून ओळखला जातो. गेल्या दोन वर्षांत चांगला पाऊस झाल्याने जनावरांसाठी पिण्याचे पाणी व पुरेसा चारा उपलब्ध झाला आहे. यातूनच पशुधनात लक्षणीय वाढ झाली आहे.

Cow
''हे सरकार नसते तर भुजबळ मंत्री म्हणून दिसले नसते''

जास्त दूध देणाऱ्या जनावरांना वाढली मागणी

गायी-म्हशींची संख्या वाढल्याने या भागातील हजारो लिटर दूध मोठ्या डेअरींमध्ये विक्रीसाठी जाते. या व्यवसायातून दळणवळण वाढले. मजुरांना रोजगार मिळाला. दोन वर्षांपूर्वी चाऱ्याअभावी अनेक शेतकऱ्यांनी कमी दरात जनावरांची विक्री केली होती. अशा शेतकऱ्यांनी आता जनावरे खरेदी करण्यास सुरवात केली आहे. संकरित जनावरांमुळे खासगी पशुवैद्यकीय व्यवसाय वाढला आहे. जनावरांची निगा राखताना डॉक्टर जागेवर सेवा देत आहेत. एकूणच निमगाव व परिसर दुभते जनावरे व दुधाचे माहेरघर ठरू पाहत आहे.

''संकरित गायी-म्हशी या जनावरांची ने-आण करणे जबाबदारीचे आहे. व्यापार करताना सर्व परवाने तयार करावे लागतात. जिल्हा बदल करताना ज्या अडचणी पूर्वी येत होत्या त्या आता ऑनलाइन पद्धतीमुळे सोपस्कार झाल्या. गेल्या वर्षीच्या तुलनेने व्यवसायात वाढ झाली आहे. जास्त दूध देणाऱ्या जनावरांना मागणी वाढली आहे.'' - ननू हसन शेख, व्यापारी, राहुरी

''शेतकरी आणि व्यापारी यांच्यातील पशुधनाचा व्यवहार विश्‍वासावर होतो. दुभत्या जनावरांसाठी जास्त रक्कम मोजावी लागते. मुबलक चारा व पाणी उपलब्ध असल्याने शेतकरी गायी-म्हशी घेत आहेत. मध्यस्थामार्फत पैशांची देवाणघेवाण होते. मी स्थानिक रहिवासी असल्याने जबाबदारीचे काम चोख करावे लागते.'' - बाळू मरसाळे, एजंट, निमगाव

Cow
वाढते कर्ज; नापिकीला कंटाळून शेतकऱ्याने संपविली जीवनयात्रा

''तरुण शेतकरी दुग्धव्यवसायात उतरल्याने शेतीबरोबरच दुग्धव्यवसाय वाढला. पुरेसा चारा जरी उपलब्ध असला तरी जास्त दुधासाठी शेतकरी पशुखाद्य खरेदी करतात. मक्यापासून केलेले खाद्य मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे.'' - विपुल नंदाळे, पशुखाद्य विक्रेते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()