VIDEO : निदान 'या' नऊ महिन्याच्या चिमुरडीचं तरी ऐका...'ती' काय म्हणतेय एकदा तरी बघाच

stay home safe home.jpg
stay home safe home.jpg
Updated on

नाशिक : जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातला असून दिवसागणिक फैलाव वाढतच चालला आहे. तसेच, महाराष्ट्राच्या प्रत्येक शहरामध्ये कोरोनाची महामारी पसरत आहे. या फैलावाला आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात खबरदारी घेतली जात आहे. मात्र कोरोनापासून बचाव करण्यासाठी किया गवळी या 9 महिन्याच्या मुलीच्या संरक्षणासाठी आई वडिलांनी घरात एक चौकट आखून दिली आहे त्यात अनेक संदेश देण्यात आले आहेत. 

आई वडिलांनी घरात एक चौकट आखून संदेश

मालेगाव येथील संभाजी नगर परिसरात राहणाऱ्या पूजा व गणेश गवळी हे मुलगी जन्मला आल्यापासून प्रत्येक महिन्यात येणाऱ्या सणाची थीम घेऊन फोटोशुट करतात. मात्र ह्या महिन्यात कोरोनाचा व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव व लॉकडाउन लक्षात घेता ह्या दाम्पत्याने एक आगळावेगळा संदेश नागरिकांपर्यंत पोहचण्याच्या दृष्टीने कोरोना थीम घेऊन कियाचे फोटोशूट केले आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये यासाठी सरकारकडून अनेक जाहिराती व उपाययोजना केल्या जात आहे. मात्र नागरिक काही मनावर घेत नाही. काहीतरी काम सांगून घराबाहेर पडत आहेत. या सर्व सूचनांचे पालन करण्याचे सोडून नागरिकांकडून केराची टोपली दाखवली जात आहे. यावर उपाय म्हणून सेलिब्रिटीकडून देखील नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र कोरोनापासून बचाव करण्यासाठी किया गवळी या 9 महिन्याच्या मुलीच्या संरक्षणासाठी आई वडिलांनी घरात एक चौकट आखून दिली आहे त्यात अनेक संदेश देण्यात आले आहेत. 

चिमुकलीमार्फत कोरोनासंदर्भात जनजागृती...

कोरोनापासून बचाव होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सॅनिटायझर, हॅन्डवॉश, साबण, मास्क, रुमाल, डेटॉल यांचा देखील यात समावेश करण्यात आला आहे. गवळी दांपत्याने आपल्या 9 महिन्यांच्या चिमुकलीमार्फत कोरोनासंदर्भात जनजागृती व्हावी यासाठी ही संकल्पना वापरून मुलीचे फोटोशूट केले आहे. या फोटो शूटच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत संदेश पोहचवण्याचे काम देखील करत आहेत. घरात एका मोठ्या जागेत कोरोनपासून बचाव होण्यासाठी काय केले पाहीजे आपल्यासह इतरांची कशी काळजी घेता येईल हे यात दाखवले गेले आहे. 

या थीममध्ये देण्यात आलेले संदेश 

वारंवार हात धुणे
सुरक्षित अंतर राखणे
नमस्कार करणे
सॅनिटायझरचा वापर करणे
घरातच सुरक्षित राहणे
मास्कचा वापर करणे
गरीब व गरजूंना मदत करणे 

आम्ही दर महिन्याला मुलीचा जन्मदिवस साजरा करतो. हा दिवस साजरा करतांना त्या महिन्यातील सण उत्सवाप्रमाणे पूर्ण सजावट केली जाते. ह्या महिन्यात कोरोनाचा प्रभाव वाढत असल्याने नागरिकांना घरात राहण्यासाठी कोरोना थीमद्वारे संदेश देण्याचे काम करत आहोत. - पूजा गवळी, मालेगाव  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.