नाशिक - शेतकऱ्यांना वीजबिल माफी करून न्याय दिला. त्यामुळे विरोधकांना न जुमानता ही योजना भविष्यातही सुरू ठेवू. शेती व शेतकरी बांधवांना समृद्धीकडे नेणार आहोत. काँग्रेसप्रमाणे शेतकऱ्यांना फसवी वीजबिल माफी दिलेली नाही..साडेआठ हजार मेगावॉट वीज निर्मितीचे प्रकल्प पूर्ण होऊन, येत्या सहा महिन्यांत शेतकऱ्यांना दिवसाही वीजपुरवठा करू, आम्ही काम करणारी माणसे, जो वादा करतो तो आम्ही पूर्ण करतो, असा शब्द राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) अध्यक्ष अजित पवार यांनी दिला..महायुतीचे निफाड विधानसभा मतदार संघाचे उमेदवार दिलीप बनकर यांच्या प्रचारार्थ गुरुवारी आयोजित सभेत पवार बोलत होते. या वेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, भाजप नेते यतीन कदम उपस्थित होते..अजित पवार म्हणाले, ‘सरकारमध्ये राज्याचा विकास करण्यासाठी गेलो. राज्याचे प्रश्न सुटावेत. पश्चिमेकडे पडणारे पाणी पूर्वेकडे आणायचे आहे. पाण्याचा प्रश्न महाराष्ट्राच्या दृष्टीने गहन आहे. महाराष्ट्रात पुन्हा हे सरकार का आणायचे आहे, कारण केंद्रात आपले सरकार आहे. त्यांच्या मदतीने भरघोस निधी आणता येईल, प्रश्न सोडविता येतील..सरकारमध्ये सामील झाल्यानंतर जात-पात, धर्म न पाहता सामान्यांसाठी योजना राबवल्या.’’साखर कारखान्यांची गाळप क्षमता वाढली पाहिजे. ३५०० रुपयांवर भाव देत आला पाहिजे, यासाठी काम केले पाहिजे. कारखाने कर्जमुक्त असतील तर चांगला भाव देऊ शकतात, असे पवार यांनी सांगितले.#ElectionWithSakal.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.