Nashik News : निफाड, दिंडोरी तालुक्यांत फुलल्या द्राक्षबागा; शेतकऱ्यांना चांगल्या दराची अपेक्षा

Grapes Crop & Happy Farmer
Grapes Crop & Happy Farmeresakal
Updated on

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : दोन वर्षे झालेल्या अतिवृष्टी व कोरोनामुळे तोट्यात आलेली द्राक्ष शेती यंदा तरी शेतकऱ्यांना उत्पन्न मिळवून देईल का, या आशेवर द्राक्ष उत्पादक शेतकरी आहेत. गेल्या वर्षी द्राक्षबागांनी पावसात कसाबसा तग धरला होता. फलधारणा अपुरी झाल्याने द्राक्षांचे उत्पादन निम्म्याहून खाली आले. मात्र, या वर्षी या भागातील द्राक्षबागा फुलल्या असून, चांगल्या दराची अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत. (Niphad Dindori talukas flourished grapes Farmers expect good price Nashik Latest Marathi News)

निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत, कसबे सुकेणे, पालखेड, दिंडोरी तालुक्यांतील मोहाडी, खेडगाव वरखेडा आदी भागातील सुमारे ७० हजार एकर क्षेत्रांवर शेतकरी निर्यातक्षम द्राक्षांचे उत्पादन घेतात. त्यातून शेतकऱ्यांच्या हातात चार पैसे येतात. मात्र, कोरोनाच्या महामारीत द्राक्षांची कमी झालेली निर्यात आणि गेल्या दोन वर्षांत अतिवृष्टीमुळे उत्पादनात झालेली घट यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला. यावर मात करीत या भागातील द्राक्षांच्या ऑक्टोबरमध्ये छाटण्या पूर्ण झाल्या आहेत.

पोटच्या गोळ्याप्रमाणे सांभाळलेल्या बागांत यंदा चांगले फ्लॉवरिंग होऊन फळधारणाही चांगली झाली आहे. त्यामुळे यंदा द्राक्षांचे उत्पादन वाढणार आहे. गत वर्षी निर्यातक्षम द्राक्षास ६० ते ८० रुपये प्रतिकिलो दर होता. स्थानिक बाजारपेठेत २० ते ३५ रुपये प्रतिकिलो दर मिळाला होता. अवेळी पडणारा पाऊस, लहरी हवामानामुळे गत दोन वर्षांत झालेले नुकसान यंदा कसे भरून काढता येईल, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे.

हेही वाचा :मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

Grapes Crop & Happy Farmer
Balasaheb Thorat Statement : आत्मविश्वास डगमगला की ज्योतिष आठवतो

व्यापाऱ्यांनी लूट थांबवावी

गेल्या दोन वर्षांत पावसामुळे द्राक्षांचे उत्पन्न निम्म्याहून कमी आले होते. त्यात कोरोनाचे कारण सांगून व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची दरात लूट केली. अपेक्षेप्रमाणे दर न मिळाल्याने शेतकरी तोट्यात गेला. तोट्यात गेलेल्या शेतकऱ्यांची कर्जेही थकीत गेली. कर्ज, हातउसने करून टिकवलेल्या बागांत या वर्षी शेतकरी आपले नशीब आजमावताना दिसतो आहे. द्राक्ष शेतीत झालेले नुकसान या वर्षी द्राक्षांना चांगला दर मिळाला तर भरून निघण्यास मदत होणार आहे. त्यामुळे दोन वर्षांत झालेली आंबट द्राक्षे यंदा तरी गोड होणार का, असा शेतकरी सवाल उपस्थित करत आहेत.

"गेल्या दोन वर्षांत शेतकऱ्यांनी पिकविलेल्या द्राक्षांना अपेक्षित दर मिळाला नाही. व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची लूट थांबवून योग्य दर देऊन शेतकऱ्यांना हातभार लावावा."
- बाबासाहेब शिंदे (माजी संचालक, बाजार समिती, पिंपळगाव बसवंत)

Grapes Crop & Happy Farmer
Nashik News : पोषण आहार अनुदान वाढले; आमचे कधी ?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.