Nashik Employees Protest: निसाकाचे कामगार आक्रमक! थकीत वेतनासाठी तीव्र आंदोलनाचा पवित्रा

Workers present at the Dwarsabha held in front of the gate of Niphad Cooperative Sugar Factory.
Workers present at the Dwarsabha held in front of the gate of Niphad Cooperative Sugar Factory.esakal
Updated on

Nashik Employees Protest : निसाका व्यवस्थापन व जिल्हा बँकेला कामगारांना पैसे देण्याची मानसिकता नाही. त्यामुळे आम्हाला नाही तर तुम्हाला नाही, अशी भुमिका कामगारांनी मांडली. आधी कामगारांचे हित बघावे, महाराष्ट्रात इतके मोठे राजकारण घडत आहे.

परंतु, कायदेशीर मार्गाने लढा दिल्यास यश नक्की मिळेल‌ असा विश्वास सोमवारी (ता.२५) निफाड सहकारी साखर कारखान्याच्या गेटसमोर झालेल्या द्वारसभेत व्यक्त करण्यात आला.

दरम्यान, जिल्हा बँकेच्या विरोधात आज गांधीगिरी मार्गाने भजन आंदोलन करण्यात आले. शिवाय त्यानंतर साखळी उपोषण, बेमुदत उपोषण व बँकेविरुद्ध मूकमोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला. (niphad Sugar Factory workers aggressive Posture of intense agitation for arrears of wages nashik)

कामगार युनियनचे सरचिटणीस बी. जी. पाटील म्हणाले, कामगारांच्या थकीत वेतनापैकी दोन वेतन अदा केले. मात्र, त्यानंतर कामगारांना दोन दिवस सुट्टी देण्यात आली. सोमवारी कामगार हजर झाले असताना गेट बंदच होते.

त्यामुळे अधिकारी वर्गाची ही भूमिका कामगारांसाठी चुकीची आहे. कामगारांच्या न्याय मागण्यांसाठी प्रसंगी आहुती देण्याची तयारी असून, कायदेशीर मार्गाने लढा दिला जाईल.

आंदोलन करूनही प्रश्न मार्गी न लागल्यास आंतरवाली सराटी येथील मनोज जरांगे- पाटील यांच्यासारखा लढा उभारला जाईल.

हजारो कामगारांच्या अन्नात माती कालवण्याचे काम कोणीही करू नये. खासदार हेमंत गोडसे यांच्यासह व्यवस्थापनाशी चर्चा करण्याची आमची तयारी आहे. त्यासाठी कामगारांनी एकजूट दाखवावी, असे आवाहन त्यांनी केले.

युनियनचे अध्यक्ष सोमनाथ गडाख म्हणाले, नियमित पगाराची तारीख कोणती आणि उर्वरित कामगारांना कामावर कधी घेणार, या दोन मागण्या अद्याप प्रलंबित आहेत. गेटला कुलुप का लावले या विषयावर चर्चा करण्यासाठी बैठक बोलावण्यात आली आहे.

१०८ कोटी रुपये ड्रायपोर्टसाठी जमा झाले असताना कामगारांच्या थकीत ८१ कोटी रुपयांचे काय? ड्रायपोर्टं प्रकल्पाला कोणत्याही कामगाराचा विरोध नाही, उलट एकमुखी पाठिंबा आहे. कारखाना भाडेतत्त्वावर सुरू झाल्यानंतर कामगार चुकीची भुमिका घेतात, मात्र तसा गैरसमज कोणीही घेऊ नये.

जिल्हा बँकेच्या चुकीमुळेच कामगारांवर बेरोजगारीची कुर्हाड कोसळली आहे. ड्रायपोर्टसाठी मिळालेल्या १०८ कोटी रुपयांतून कामगारांची थकबाकी मिळविण्याची हीच वेळ आहे.

तत्कालीन बँक प्रशासक व आताचे प्रशासक यांची कामगारांना पैसे देण्याची मानसिकता नाही. त्यामुळे बँकेविरुद्ध लढा तीव्र करण्याची गरज असल्याचे गडाख यांनी नमूद केले.

कामगार उकाडे म्हणाले, कारखाना संपूर्ण विकून टाकला, काही ठेवलेच नाही. कामगारांची माती करु नका. टाईम आॅफीसला काम करणारे हांडोरे यांच्याविरोधात रोष व्यक्त केला गेला. कामगारांचे स्लॉट पाडले हेच चुकीचे आहे.

थकीत रक्कम मिळत नाही तोपर्यंत जिल्हा बँकेच्या प्रक्रियेवर स्टे आणावा. कामगारांचा पीएफ कपात केला जात नाही. कामगार युनियनला अजून वर्गणी देण्यास तयार आहोत, पण युनियनने बँकेच्या प्रक्रियेवर स्टे आणावा.

एन. डी. पवार म्हणाले, कामगारांना पैसे देण्याची मानसिकता नाही. त्यामुळे आम्हाला नाही तर तुम्हाला नाही अशी भुमिका मांडली. आधी कामगारांचे हित बघावे. महाराष्ट्रात इतके मोठे राजकारण घडत आहे.

परंतु, कायदेशीर मार्गाने लढा दिल्यास यश नक्की मिळेल‌. कामगार केशव झाल्टे म्हणाले, ८१ कोटींची केवळ वसुली आहे. पण, ड्रायपोर्टसाठी मिळालेल्या १०८ कोटीमध्ये ८१ कोटी देण्याची तरतूद आहे का? कामगारांना अंधारात ठेवण्याचा हा प्रकार आहे.

आमदार दिलीप बनकर यांच्याकडे याबाबत प्रश्न मांडला होता. पण, त्यांनी विरोधक माजी आमदार अनिल कदम यांच्याकडे बोट केले. त्यानंतर कदम यांच्याकडे प्रश्न मांडला असता त्यांनीही तीच भूमिका घेतली.

रायते म्हणाले, कारखान्याचे गेट का बंद केले, याबाबत कुठलाही खुलासा व्यवस्थापनाने केलेला नाही, ही गंभीर बाब आहे. नोटीस न देताच गेटला कुलूप लावले. आजी - माजी लोकप्रतिनिधींनी याप्रकरणी लक्ष घातले पाहिजे.

ड्रायपोर्टसाठी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या पुढाकारातून निधी मिळाला आहे. त्यामुळे त्यांनाच जाब विचारला पाहिजे. सर्व कामगारांनी एकजूट करून लढा द्यावा. अधिकारी वर्गाने कामगारांच्या बाजूने उभे राहिले पाहिजे. तरच थकीत रक्कम मिळेल.

माजी कार्यकारी अध्यक्ष संदीप मोगल म्हणाले, ड्रायपोर्टसाठी १०८ कोटी रुपये आल्यानंतर त्यातून कामगारांची थकीत देणी अदा केली नाही तर कामगारांचा उद्रेक होईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले होते.

Workers present at the Dwarsabha held in front of the gate of Niphad Cooperative Sugar Factory.
Onion Traders Protest : राज्यातील व्यापारी 26 नंतर बंदमध्ये सहभागी होणार! लिलाव बंदचा कांदा व्यापाऱ्यांचा निर्णय

जिल्हा बँकेला तसा अधिकार आहे, त्यामुळे आता एकमेव मार्ग म्हणजे बँकेविरोधातच आवाज उठवणे गरजेचे आहे. त्यासाठी आंदोलन किंवा कायदेशीर मार्गच महत्त्वाचा आहे, असे त्यांनी नमूद केले.

प्रभारी कार्यकारी संचालक संजय हांडोरे म्हणाले, काही अधिकार हे व्यवस्थापनाला असल्याने मला हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही.

पण, मी कामगारांच्या बाजूने बी. टी. कडलग, खासदार हेमंत गोडसे यांच्यासमोर भक्कम भुमिका मांडली आहे. त्यामुळे कोणाचा गैरसमज असेल तर तो दूर करावा. ज्यावेळी कामगारांना न्याय मिळणार नाही, त्यावेळी मी राजीनामा देईल.

कामगार युनियनचे सहचिटणीस नवनाथ गायकवाड, सुभाष झोमण, खजिनदार बाळासाहेब बागस्कर, उत्तम गायकवाड, संतोष रायते, केशव झाल्टे, मोतीराम जाधव, माजी कामगार संचालक दिनकर निकम, भाऊसाहेब कापडी, माजी कार्यकारी अध्यक्ष संदीप मोगल, एन. डी.पवार, प्रभारी कार्यकारी संचालक संजय हांडोरे, भागवत भंडारे, बाळासाहेब सुरवाडे, पिंपळसचे माजी सरपंच तानाजी पूरकर, पंडित मत्सागर, दर्शन केंगे, वसंत जाधव, त्र्यंबक पूरकर, विष्णू संगमनेरे यांच्यासह असंख्य कामगार उपस्थित होते.

जिल्हा बँकेच्या शाखेसमोर गांधीगिरी आंदोलन

कामगारांना थकीत रक्कम दिली जात नसल्याने कामगार युनियनच्या द्वारसभेत तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. त्यानंतर आंदोलनाची दिशा ठरवत आज टाळ मृदंगाच्या गजरात कारखाना स्थळावरील जिल्हा बँकेच्या शाखेसमोर गांधीगिरी आंदोलन करण्यात आले.

त्यानंतर कर्मवीर माधवराव बोरस्ते, काकासाहेब वाघ यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हा बँकेच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली.

Workers present at the Dwarsabha held in front of the gate of Niphad Cooperative Sugar Factory.
Nashik Water Crisis: नाशिककरांच्या पाणी संकटात कपात; गंगापूर धरणात 82 टक्के पाणी ठेवणे शक्य

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()