National Youth Festival : देशाच्या प्रगतीत युवकांचे स्थान महत्त्वाचे : निसिथ प्रामाणिक

युवकांचे प्रेरणास्थान असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश प्रगती करत आहे.
Union Minister of State for Youth Affairs and Sports, Nisith Pramanik, along with the awardees who were honored with Youth Awards at the National Youth Festival
Union Minister of State for Youth Affairs and Sports, Nisith Pramanik, along with the awardees who were honored with Youth Awards at the National Youth Festivalesakal
Updated on

नाशिक : युवकांचे प्रेरणास्थान असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश प्रगती करत आहे.

देशाच्या प्रगतीमध्ये युवकांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे असून, त्यांच्यामुळेच युवकांचा देश म्हणून भारताची ओळख निर्माण झाल्याचे प्रतिपादन केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री निसिथ प्रामाणिक यांनी केले. (nisith pramanik statement at National Youth Festival role of youth important in progress of country nashik)

२७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवात सोमवारी (ता.१५) देशातील पंधरा युवकांना राष्ट्रीय युवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यावेळी युवा कार्य मंत्रालयाच्या संचालिका वनिता सूद, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, क्रीडा आयुक्त सुहास दिवसे उपस्थित होते. युवा महोत्सवानिमित्त निलगिरी बागेतील हनुमान नगरमध्ये उभारण्यात आलेल्या ‘महायुवा ग्राम’ मध्ये हा सोहळा पार पडला.

राष्ट्रीय युवा पुरस्कार १५ ते २९ वयोगटातील व्यक्तींना राष्ट्रीय किंवा समाजसेवेच्या क्षेत्रात उत्कृष्ट योगदानासाठी प्रदान केला जातो.

युवकांमध्ये जबाबदारीची भावना निर्माण करणे, वैयक्तिक वाढीस चालना देणे या कार्यासाठी हा पुरस्कार प्रदान केला जातो. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी युवक महोत्सवात या पुरस्कारांचे वितरण होते.

महाराष्ट्रातील दोघांचा समावेश

राष्ट्रीय युवा पुरस्कार्थींमध्ये महाराष्ट्रातील दोन युवतींना सन्मानित करण्यात आले. अकोल्याची वैष्णवी गोतमारे हिने महिला सक्षमीकरण व रक्तदान या क्षेत्रात सामाजिक कार्य केले. यानिमित्त तिला २०२०-२१ या वर्षाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

तर लातूर येथील विधी पलसापुरे हिने गरीब व वंचितांच्या शिक्षणासाठी विशेष प्रयत्न केले. त्याबद्दल केंद्र सरकारतर्फे तिला २०२०-२१ या वर्षांचा राष्ट्रीय युवा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Union Minister of State for Youth Affairs and Sports, Nisith Pramanik, along with the awardees who were honored with Youth Awards at the National Youth Festival
National Youth Festival : ‘लाल’रंगापेक्षा सप्तरंगांनी नटलेले काश्मीर बघा; राष्ट्रीय युवा महोत्सव

राष्ट्रीय युवा पुरस्कार्थी

- अधी दैव (गुरुग्राम, हरियाना)

- अंकित सिंग (छतरपूर, मध्यप्रदेश)

- बिसाथी भारत (अनंतपुरम, आंध्रप्रदेश)

- केवल किशोरभाई पावरा (बोताड, गुजरात)

- पल्लवी ठाकूर (पठाणकोट, पंजाब)

- प्रभात फोगट ( झज्जर, हरियाना)

- राम बाबू शर्मा (जयपूर, राजस्थान)

- रोहित कुमार (चंडीगड)

- साक्षी आनंद (पाटणा, बिहार)

- सम्राट बसाक (धलाई, त्रिपुरा)

- सत्यदेव आर्य (बरेली, उत्तर प्रदेश)

- वैष्णवी श्याम गोतमारे (अकोला, महाराष्ट्र)

- विधी सुभाष पलसापुरे (लातूर, महाराष्ट्र)

- विनिशा उमाशंकर (तिरुवन्नमलाई, तमिळनाडू)

- विवेक परिहार (उधमपूर, जम्मू आणि काश्मीर)

Union Minister of State for Youth Affairs and Sports, Nisith Pramanik, along with the awardees who were honored with Youth Awards at the National Youth Festival
National Youth Festival: साहसी खेळांची युवा महोत्‍सवात उपेक्षा; सहभागींपर्यंत माहिती न पोहोचल्‍याने मर्यादित उपक्रम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.