Shree Swami Samarth Gurupeeth : आध्यात्मात काळानुरूप बदल आवश्यक : नितीनभाऊ मोरे

Nitin Bhau More guidance Need to change with time in spirituality nashik news
Nitin Bhau More guidance Need to change with time in spirituality nashik newsesakal
Updated on

Shree Swami Samarth Gurupeeth : भगवान विष्णूंनी दशावतार घेतले. या सर्व आविष्कारांनी विभिन्न कार्य केले. त्या-त्या परिस्थितीत जे आवश्यक आहे, असेच दैवी कार्य या अवतारांनी केले.

त्यामुळे आध्यात्मात काळानुरूप बदल आवश्यक असून, हे बदल सर्वांनी स्वीकारले पाहिजेत, असे स्पष्ट मत अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाच्या देश-विदेश अभियानाचे प्रमुख नितीनभाऊ मोरे यांनी व्यक्त केले. (Nitin Bhau More guidance Need to change with time in spirituality nashik news)

सेवामार्गाचे प्रमुख गुरुमाउली अण्णासाहेब मोरे यांच्या आशीर्वादाने सेवामार्गातर्फे त्र्यंबकेश्वर येथील गुरुपीठात सातदिवसीय निवासी याज्ञिकी प्रशिक्षण सुरू आहे. संपूर्ण राज्यभरातून २६० प्रशिक्षणार्थी सहभागी झाले आहेत.

या प्रशिक्षणात नामजप, यज्ञ सप्ताह, विशेष स्तोत्र, मंत्र, पूजा पद्धती, संध्या, होमहवन, संस्कृत संवाद या सेवांविषयी प्रशिक्षण देऊन नवीन याज्ञिकी घडविले जात आहेत. गुरुवारी (ता. २७) नितीनभाऊ मोरे यांनी याज्ञिकी प्रशिक्षणात मार्गदर्शन केले.

श्री. मोरे म्हणाले, की अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्ग नेहमी जनहित आणि राष्ट्रविकासाला प्राधान्य देतो. काही दशकांपूर्वी आध्यात्मिक सेवा महिला-भगिनींना करण्याचा अधिकार नव्हता. मात्र, सद्‌गुरू परमपूज्य मोरेदादांनी माता-भगिनींना श्रीगुरुचरित्र तसेच श्री दुर्गा सप्तशती वाचण्याचा अधिकार मिळवून दिला आणि आध्यात्मात जणू क्रांती केली.

त्यामुळे आज प्रत्येक महिला सेवेकरी श्रीगुरुचरित्र पारायणाची सेवा आनंदाने करू शकते. त्याच पद्धतीने परमपूज्य गुरुमाउलींनीही श्रीगुरुचरित्राचे शुद्धीकृत रूप प्रकाशित करून आध्यात्मात महत्त्वपूर्ण कार्य केले. गुरुमाउलींनी काळानुरूप योग्य ते बदल करून सर्वसामान्यांना आध्यात्म अतिशय सोपे करून सांगितले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Nitin Bhau More guidance Need to change with time in spirituality nashik news
Gurumauli Annasaheb More : कायदा आणि शिक्षणासाठी ‘गीता रहस्य’ उपयोगी : गुरुमाउली

संक्षिप्त भागवत, ९०० श्लोकी भागवत, श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथांप्रमाणेच जुन्या व नवीन घराची वास्तुशांती करण्यासाठी वास्तुशांती भाग- १ व वास्तुशांती भाग- २ हे महत्त्वपूर्ण ग्रंथ गुरुमाउलींनी प्रकाशित करून सेवेकऱ्यांना वास्तुशांतीसाठी सोसावा लागणारा खर्च कमी केला असल्याचे श्री. मोरे यांनी सांगितले.

प्रशिक्षण संपल्यावर सहभागी नवोदित याज्ञिकींनी आपापल्या घरी ‘वास्तुशांती’चा विधी गृहपाठ म्हणून करावा, अशी सूचना त्यांनी केली. वेदकाळापासून सुरू असलेला होमहवन विधी पर्यावरण व मानवी देहाच्या शुद्धीसाठी आवश्यक आहे.

कारण हवन केल्यावर निघणारा वायू हवेतील प्रदूषण नष्ट करण्यासाठी मदत करतो, असे त्यांनी नमूद केले. आगामी काळात गाणगापूरला बालसंस्कार आणि पीठापूरला देश-विदेश अभियानाचे प्रशिक्षण होणार आहे.

Nitin Bhau More guidance Need to change with time in spirituality nashik news
Shri Swami Samarth Gurupeeth : प्रत्येक शनिवारी एकदिवसीय श्रीगुरुचरित्र पारायण : चंद्रकांतदादा मोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.