नाशिक-मुंबई अंतर दोन तासांवर आणणार; नितीन गडकरींचे आश्वासन

nitin gadkari announces expansion and concreting of Nashik-Mumbai highway
nitin gadkari announces expansion and concreting of Nashik-Mumbai highwaySakal
Updated on

नाशिक : रोडकरी म्हणून प्रसिध्द असलेले केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी पुन्हा एकदा नाशिक व ठाणेकरांच्या पदरात भरभरून गिफ्ट देताना अनेक महिन्यांपासून खाच, खळग्यांमुळे शारीरीक व्याधींनी त्रस्त असलेल्या वाहनधारकांना दिलासा दिला आहे. नाशिक-मुंबई चार पदरी महामार्गाचे (Nashik-Mumbai Highway) सहा पदरीत रुपांतर करताना संपुर्ण रस्ता सिमेंट कॉन्क्रिटचा करण्याची घोषणा त्यांनी केली. त्यासाठी पाच हजार कोटी रुपयांची तरतुद केली जाणार असून नाशिक-मुंबई अंतर दोन तासांवर आणले जाणार आहे. त्याचबरोबर नाशिकरोड ते द्वारका या दरम्यान एलिव्हेटेड पध्दतीचा डबलडेकर उड्डाणपुलाची घोषणा करताना त्यासाठी १६०० कोटी रुपयांची तरतुद केली.


राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने ६३० किलोमीटर लांबीच्या व दोन हजार ४८ कोटी रुपयांच्या रस्ते प्रकल्पांचे लोकार्पण व कोनशिला अनावरण श्री. गडकरी यांच्या हस्ते ऑनलाईन उदघाटन झाले. त्यावेळी ते बोलतं होते. नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ व केंद्रीय पंचायत राज्यमंत्री व भिवंडीचे खासदार कपिल पाटील यांच्या मागणीच्या अनुशंगाने श्री. गडकरी यांनी मुंबई-नाशिक महामार्गाचे सहा पदरी विस्तारीकरण करण्याची घोषणा करताना नाशिक-गोंदे, वडपे पर्यंतचा रस्ता सिमेंट कॉन्क्रीटचा करण्याची घोषणा केली. त्यासाठी पाच हजार कोटी रुपये गुंतवणुक केली जाणार आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याबरोबरचं ठाणे ते वडपे रस्ता आठ पदरी करण्यासाठी आठशे कोटी रुपयांची गुंतवणुक केली जाणार आहे. दोन्ही रस्ते समृध्दी महामार्गाला जोडले जाणार आहे.

nitin gadkari announces expansion and concreting of Nashik-Mumbai highway
नाशिक : लसीकरणासाठी सुरवातीला बोंबाबोंब, आता केंद्रे ओस


नाशिकरोड-द्वारका एलिव्हेटेड उड्डाणपुल

नाशिकरोडच्या दत्तमंदीर ते द्वारका दरम्यान एलिव्हेटेड पध्दतीचा उड्डाणपुल उभारला जाणार असून त्यासाठी १६०० कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. खालच्या भागात शहर वाहतुकीसाठी चार पदरी मार्ग त्यावर अवजड वाहनांसाठी उड्डाणपुल व त्यावर आणखी एक मेट्रो साठी उड्डाणपुल केला जाणार आहे. दोन वर्षात उड्डाणपुल तयार करण्याचे आश्‍वासन गडकरी यांनी देताना न्हाई व महामेट्रो मार्फत खर्च वाटून घेतला जाणार आहे.

गडकरींच्या सुचना

- सुरत-चेन्नई ग्रीन फिल्ड महामार्गा लगत ट्रक टर्मिनस उभारा
- नागपूरच्या धर्तीवर उड्डाणपुलाखाली चित्रे काढावी.
- राज्याने १६ कोटी रुपये प्रतिहेक्टर भुसंपादनाचा दर कमी करावा.
- ग्रीन फिल्डवर स्मार्ट सिटी उभारावी.
- नाशिक महापालिकेने लॉजिस्टीक पार्क उभारावे.
- डांबरी रस्त्यांवर सिमेंटचा थर लावल्यास रस्ते खड्डेमुक्त.
- गुजरात-महाराष्ट्र सरकारने समुद्राला मिळणारे पाण्याचा वापर करावा.
- अपघात कमिटी मार्फत अपघात शुन्य प्रवासासाठी खासदारांनी प्रयत्न करावे.

गडकरींच्या घोषणा

- ध्वनी प्रदुषण रोखण्यासाठी मेट्रोला ध्वनीरोधक यंत्रणा.
- पोलिस व्हॅन व ॲम्ब्युलन्स वरील सायरन बंद करणार.
- सायरन एवजी भारतीय वाद्यांच्या धुन लावणार.
- शिर्डी-सिन्नर-त्र्यंबक या धार्मिक स्थळांसाठी १०२६ कोटींचा महामार्ग.
- सटाणा- मनमाड महामार्गासाठी ३३१ कोटींची तरतुद.
- नांदगाव-मनमाड-नस्तनपुर दरम्यान रल्वेवर उड्डाणपुल.
- सुरत ग्रीन फिल्डवरून वसई मार्गे वांद्रे-वरळी पर्यंत उड्डाणपुलाचे नियोजन.
- मिरा भाईंदर, भिवंडी, बदलापुर येथे लॉजिस्टीक पार्क.
- नाशिक शहरापासून समृध्दी महामार्गापर्यंत रस्ते विकास.

nitin gadkari announces expansion and concreting of Nashik-Mumbai highway
बापरे! नाशिकमध्ये बिबट्याचा कहर; तीन दिवसात 2 चिमुकल्या भक्ष


खासदार गोडसेंची माघार

दोन महिन्यांपुर्वी के. के वाघ ते आडगाव दरम्यान उड्डाणपूलाचे उदघाटन करणाया खासदार गोडसे यांनी आजच्या सोहळ्यात सपशेल माघार घेतली. मी केवळ उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला केला, उड्डाणपुलाचे लोकार्पण व कोनशिला अनावरण समारंभ तर गडकरी साहेबांच्या हस्ते आज झाल्याचे त्यांनी जाहीर केले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.