Nashik News: उद्योजक अशोक कटारियांकडून फसवणूक; नितीन सुगंधी यांचा दावा

fraud crime
fraud crime esakal
Updated on

Nashik Fraud Crime: येथील प्रसिद्ध उद्योजक अशोक कटारिया यांनी सिन्नर तालुक्यात शेतकरी असल्याचे बनावट पुरावे देऊन मोठ्या प्रमाणात शेतजमिनी घेतल्याचा दावा करण्यात आला असून, या माध्यमातून शासनाची फसवणूक केली आहे.

शासनाने शेतकरी नसताना शेतजमीन खरेदी केल्याच्या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते नितीन सुगंधी यांनी केली आहे. कालिका मंदिर सभागृहात शनिवारी (ता. २५) झालेल्या पत्रकार परिषदेत सुगंधी यांनी हा दावा केला. (Nitin Sugandhi claims fraud from entrepreneur Ashok Kataria nashik fraud news)

अशोक कटारिया यांनी अशोका बिल्डकॉन लिमिटेड व इतर उपकंपन्यांच्या माध्यमातून तसेच स्वताच्या व कुटुंबीयांच्या नावे शेकडो एकर जमिनी खरेदी केल्या आहेत. नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्‍वर, सिन्नर, निफाड या ठिकाणी कटारिया यांच्या मालकीच्या जमिनी आहेत. कटारिया मुळचे सिन्नरचे रहिवासी आहेत.

त्यांच्या कुटुंबात सिन्नर अथवा महाराष्ट्रात कोठेही शेतजमीन नसल्याची खात्रीलायक माहिती आहे. त्यानंतर कटारिया यांनी १९८० च्या दशकात पहिल्यावेळी शेतजमीन खरेदी केली. त्या वेळी त्यांच्याकडे कोणताही शेतकरी पुरावा नसतानाही त्यांनी ती खरेदी केली. या खरेदी केलेल्या शेतजमिनीच्या सात-बारा उताऱ्याच्या आधारे त्यांनी हजारो एकर शेतजमीन खरेदी केली आहे. सिन्नर तहसील कार्यालयात यासंदर्भात दावा दाखल झाला आहे.

तहसीलदारांनी प्रतिवादी म्हणून कटारिया यांना म्हणणे मांडण्याची संधी दिल्यानंतर त्यांचा युक्तिवाद अमान्य करण्यात आला. सिन्नर तालुक्यातील कटारिया यांच्या नावावर असलेली सर्व शेतजमीन सरकार जमा करण्याचे आदेश देताना निफाड उपविभागीय कार्यालयाकडे दाद मागण्यासाठी मुदत दिली.

fraud crime
Nashik Fraud Crime : बचत संस्थेचे अध्यक्ष, संचालकांकडून ठेवीदारांना 20 लाखांना गंडा

परंतु निफाड प्रांताकडे दाद न मागता वेळकाढूपणा धोरण अवलंबविण्याचा भाग म्हणून उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. परंतु न्यायालयाने तहसीलदारांच्या आदेशाला स्थगिती दिली नाही. ऑगस्ट २०२३ मध्ये तहसीलदारांनी निकाल दिल्यानंतर सात-बारा उताऱ्यावर सरकारी नाव चढलेले नाही. यामागे महसूलमंत्र्यांचा दबाव असल्याचा आरोप सुगंधी यांनी केला. तसेच कटारिया यांच्या नावावर असलेल्या सर्व शेतजमिनींचा शोध घेऊन जप्ती करण्याची मागणी त्यांनी केली.

"नितीन सुगंधी यांनी अशोक कटारिया यांच्या विरोधात केलेले सर्व आरोप बिनबुडाचे व निराधार आहेत. कटारिया यांनी कायद्याच्या प्रक्रियेचे अनुपालन करून शेतजमिनी विकत घेतल्या आहेत. याबाबतचे आदेश हे या क्षणी न्यायालयीन प्रकरणी प्रलंबित आहेत.

याबाबत माहिती नसताना बिनबुडाचे आरोप करणे हे न्यायालयीन प्रक्रियेचा अवमान व अवहेलना व हेतुपुरस्कर कटारिया यांची बदनामी करण्याचा प्रकार आहे. याबाबत अब्रूनुकसानीचा दावा आम्ही लवकरच दाखल करणार आहोत. संबंधित प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्याने याबाबत अधिक बोलणे अनुचित आहे." - ॲड. श्‍वेता वाघ, अशोक कटारिया यांचे अधिवक्ता

fraud crime
Nashik Fraud Crime: अद्वय हिरे यांना भोपाळमधून अटक; ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.