नाशिक : पंढरपूर येथुन निवृत्तीनाथ महाराजांची पालखी त्रंबकेश्वर येथे परतली. आषाढी एकादशी वारीसाठी पायी त्रंबकेश्वर येथुन पंढरपूरला २६ दिवस व तेथुन परत प्रवास करीत आज दुपारी बारा वाजता शहरात प्रवेश करती झाली.
येथे स्थानिक भाविकांनी पालखीचे जंगी स्वागत केले. सवाद्य मिरवणुकीने पालखी त्रंबकेश्वर मंदिरासमोर आल्यावर नाथांच्या चांदीच्या पादुका व पताका ज्योतिर्लिंग भेटीस नेण्यात आल्या. त्रंबकेश्वर देवस्थान चे विश्वस्त भुषण अडसरे व त्यांचे सहकारी विश्वस्तांनी नाथांचे स्वागत व दर्शन केले. (Nivrutinath Maharaj palakhi returned to Trambakeshwar Latest Ashadhi Wari Marathi News)
नाथांच्या जयघोषात पालखी मेन रोड मार्गे कुशावर्त तीर्थ व तेथुन निवृत्तीनाथ मंदिरात प्रवेश करती झाली. पालखी समवेत निवृत्तीनाथ मंदिराचे विश्वस्त अॅड. भाऊसाहेब गंभीरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय रणदिवे, पुजक ह.भ.प.सुरेश महाराज गोसावी, जयंत महाराज गोसावी, सच्चिदानंद गोसावी यांच्या सह भालदार, चोपदार व पालखी समवेत ची दिंडीतील विणेकरी, टाळकरी व वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहरात ठिकाणी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. तर अनेक भाविकांनी पुष्पवृष्टी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.