Sant Nivruttinath Maharaj Palakhi : निवृत्तीनाथ महाराज पालखीचे नाशिकमध्ये होणार जोरदार स्वागत

Sant Nivruttinath Maharaj
Sant Nivruttinath Maharaj esakal
Updated on

Nashik News : आषाढी एकादशीनिमित्त त्र्यंबकेश्वरहून नाशिक पंचायत समिती कार्यालयासमोर येणाऱ्या निवृत्तीनाथ महाराज पालखी व वारकऱ्यांचे स्वागत परंपरेनुसार करण्याचे निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळा स्वागत समितीच्या बैठकीत ठरले. (Nivruttinath Maharaj palkhi will arrive at Nashik from Trimbakeshwar on 4 june nashik news)

प्रस्थानानंतर पालखीचा पहिला मुक्काम त्र्यंबकेश्‍वरलाच तर दुसरा मुक्काम सातपूरला झाल्यावर रविवारी (ता. ४) सकाळी नऊ वाजता पंचायत समितीच्या आवारात पालखीचे पारंपारिक स्वागत करण्यात येईल.

त्र्यंबकेश्वर वरून निवृत्तीनाथ महाराज पालखीचे नाशिकला ४ तारखेला सकाळी आगमन होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी गंगाथरन. डी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, मनपा आयुक्त, पोलिस आयुक्त शिंदे, गटविकास अधिकारी संगीता बारी, नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, खासदार हेमंत गोडसे, आमदार राहुल ढिकले, देवयानी फरांदे, सीमाताई हिरे व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

बैठकीत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळा स्वागत समितीचे अध्यक्ष पद्माकर पाटील, माजी आमदार बाळासाहेब सानप, उत्तमराव गाढवे आदी मान्यवर पालखी सोहळ्यासाठी दरवर्षीप्रमाणे या वर्ष देखील वारकऱ्यांसाठी भोजन, राहण्याची व्यवस्था व इतर मदत करणार असल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Sant Nivruttinath Maharaj
Vat Purnima 2023 : काय आहे वटसावित्रीमागचे विज्ञान? जाणून घ्या...

बैठकीस नरहरी उगलमुगले, हभप पुंडलिकराव थेटे, सचिन डोंगरे, रमेश कडलग, राहुल बर्वे, रत्नाकर चुंबळे, भाऊसाहेब गंभिरे, माणिकराव देशमुख, रवींद्र पाटील, अशोक महाले, जयंतभाई कंसारा, तुकाराम नागरे, दामोदर आव्हाड, महंत संपतराव धोंडगे, विलासराव थोरात, सर्जेराव वाघ व अरुण पवार आदी उपस्थित होते.

निवृत्तीनाथ पालखी सोहळ्याच्या कार्यक्रमास नाशिककरांनी सहभागी होऊन पालखीचे स्वागत रांगोळी, पताका व परंपरेनुसार करावे, असे आवाहन पालखी सोहळ्याच्या समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

मुक्काम गणेशवाडी शाळेत

४ जूनला सकाळी पालखीचे स्वागत त्र्यंबक रस्त्यावरील पंचायत समितीच्या आवारात झाल्यावर त्या दिवशीचा पालखीचा मुक्काम नाशिकमध्ये राहील. माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्यातर्फे गणेशवाडी येथील मनपा शाळेच्या आवारात पालखीचा मुक्कामाची व भोजनाची व्यवस्था राहील. यानंतर ५ तारखेला पालखी सोहळा सिन्नरकडे मार्गस्थ होईल.

Sant Nivruttinath Maharaj
Sant Nivruttinath Maharaj Palakhi : संत निवृत्तिनाथ पालखीसाठी 30 लाखांचा निधी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()