नाशिक : संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ यात्रोत्सवाला आता अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर बहुसंख्य दिंड्यांनी त्र्यंबकेश्वरकडे प्रस्थान ठेवले. अनेक दिंड्या शहरासह सातपूर, पिंपळगाव बहुला, महिरावणी, बेळगाव ठगा परिसरात मुक्कामी असून भजन, कीर्तन व भारुडात हजारो वारकरी दंग झाले.
विठूनामासह ग्यानबा तुकारामाच्या गजरात रविवारी व सोमवारी अनेक दिंड्या शहरात दाखल झाल्या. त्यातील काहींचा मुक्काम शहरात तर उर्वरित दिंड्यांचा मुक्काम सातपूरसह पिंपळगाव बहुला, बेळगाव ढगा, महिरावणी येथे राहिला.
या ठिकाणी कडाक्याच्या थंडीतही भक्तिभावाने दिंड्यामध्ये सहभागी झालेले वारकरी भजन, कीर्तनासह भारुडात रंगून गेले. (Nivruttinath Yatrotsav Bhajans Kirtans and Bharuda Varakari Participating with devotion even in winter cold nashik news)
अवघे शहरे भक्तिरसात न्हाले
संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची यात्रा षटतिला एकादशीच्या दिवशी म्हणजे बुधवारी (ता. १८) आहे. मात्र, बहुसंख्य वारकरी आदल्या दिवशीच म्हणजे मंगळवारी त्र्यंबकेश्वरला पोचतील. दिंड्यांच्या निमित्ताने पंचवटीसह शहरातील अनेक भागात टाळ मृदुंगाच्या गजरात त्र्यंबकेश्वरकडे प्रस्थान ठेवलेल्या दिंड्याच दृष्टीस पडत होत्या.
शहरात मुक्कामी असलेल्या अनेक दिंड्या सोमवारी (ता. १६) सकाळी नाशिककरांचा पाहुणचार घेऊन मार्गस्थ झाल्या. त्यांचा आजचा मुक्काम शहरासह सातपूर किंवा त्यापुढील गावांत राहणार असून मंगळवारी (ता.१७) सायंकाळी यात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला त्या त्र्यंबक नगरीत प्रवेश करतील.
सोमवारी रामतीर्थातील स्नानानंतर विविध मंदिरात वारकऱ्यांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.
दिंड्यांच्या संख्येत वाढ
कोरोना दोन वर्षांच्या खंडानंतर त्र्यंबककडे प्रस्थान ठेवलेल्या या दिंड्यांच्या संख्येत यंदा मोठी वाढ झाली आहे. आजपर्यंत तब्बल १०६ दिंड्यांची नोंद झाली आहे. टाळकरी, विणेकऱ्यांसह एका दिंडीत तीनशे ते पाचशे वारकरी सहभागी झाले आहेत.
त्यामुळे त्र्यंबक नगरीत यात्रेसाठी किमान दोन लाख वारकरी जमण्याची शक्यता आहे. यंदा कडाक्याच्या थंडीतही वारकऱ्यांत मोठा उत्साह आहे. ग्यानबा तुकारामाच्या अखंड गजरात डोईवर तुळशीपत्र धारण केलेल्या महिला शहरात मोठ्या संख्येने दृष्टीस पडत होत्या.
हेही वाचा : सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'
भोजन, निवासाची व्यवस्था
वर्षानुवर्षे सुरू असलेल्या या दिंड्यांची मुक्कामाची, भोजनाची व नाश्त्याची ठिकाणी अगोदरच निश्चित केली जातात. शहरातील अनेक समाजसेवी मंडळासह काही राजकीय नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी दिंड्यांच्या भोजनासह मुक्कामाची सोय केलेली आहे.
त्यामुळे पंचवटीसह शहराच्या अनेक भागातील मंदिरे, शाळा- महाविद्यालयाची प्रांगण, धर्मशाळा, मंगल कार्यालये, लॉन्स येथे रात्री उशिरापर्यंत टाळ मृदुंगाच्या गजरात तल्लीन झालेले वारकरीच दिसत होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.