NMC News : वर्षानुवर्षे एकाच टेबलावर चिकटलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या; 125 कर्मचाऱ्यांना दणका

NMC : महापालिकेमध्ये मनुष्यबळाची कमतरता असली तरी अनेक विभागांमध्ये गेल्या दहा ते बारा वर्षांपासून एकाच टेबलवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रशासन उपायुक्त यांनी चांगलाच दणका दिला.
NMC
NMCesakal
Updated on

NMC News : महापालिकेमध्ये मनुष्यबळाची कमतरता असली तरी अनेक विभागांमध्ये गेल्या दहा ते बारा वर्षांपासून एकाच टेबलवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रशासन उपायुक्त यांनी चांगलाच दणका दिला. जवळपास सव्वाशे कर्मचाऱ्यांना त्यांच्या पारंपरिक टेबलावरून हलवून अन्य ठिकाणी बदली करण्यात आली आहे. महापालिकेत सात हजार ९२ पदांचा आराखडा मंजूर आहे. (NMC 125 staff transfers who have been stuck at same table for years )

महापालिकेला ‘ब’ वर्ग दर्जा मिळाल्यानंतर नवीन जवळपास नऊ हजार पदांचा नवीन आकृतिबंध शासनाकडे मंजुरीसाठी प्रलंबित आहे सद्यःस्थितीमध्ये २८०० कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहे. तर उपलब्ध कर्मचाऱ्यांमध्ये जवळपास १८०० सफाई कर्मचारी असल्याने लाड पागे कमिटी अहवालानुसार त्या जागा रिक्त ठेवता येत नाही. परिणामी शहराचा विस्तार व लोकसंख्या वाढत असताना उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा मोठा ताण निर्माण झाला आहे.

यातून नागरी समस्या सुटत नसल्याची बाब समोर आली आहे मात्र असे असले तरी दुसरीकडे एकाच टेबलवर दहा ते बारा वर्षांपासून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील हटविणे आवश्‍यक होते, ते काम प्रशासन उपायुक्त श्रीकांत पवार यांनी केले. एकाच टेबलसाठी वारंवार आग्रह धरणे यातून नागरिकांची अडवणूक करणे असे प्रकार होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्या अनुषंगाने अचानक प्रशासन विभागाकडून बदल्यांचे आदेश काढण्यात आले. त्यामुळे पालिका मुख्यालयामध्ये चांगलीच खळबळ उडाली.

बदली रद्द करण्यासाठी प्रयत्न

महापालिका प्रशासनाकडून करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमध्ये काही बदल्या पंधरा ते एकवीस वर्षापासून एकाच टेबलवर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या असल्याने साहजिकच बदल्यांची सवय नसलेल्या कर्मचाऱ्यांकडून राजकीय दबाव आणून त्या बदली रद्द करण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहे. (latest marathi news)

NMC
Nashik NMC News : पावसाळा आपत्ती व्यवस्थापनासाठी महापालिका सज्ज

नियमानुसार तीन वर्षांपेक्षा एका टेबलवर काम करता येत नाही. मात्र दहा ते बारा वर्षांपासून एकाच टेबलवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या देखील लक्षणीय आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात जवळपास सव्वाशे कनिष्ठ लिपिक व शिपाई वर्गातील बदल्या करण्यात आल्या असून आता वरिष्ठ लिपिक यांना बदलीला सामोरे जावे लागणार आहे. येत्या पाच ते सात दिवसात या बदल्या होतील अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

लायब्ररीतून घेणे

''दहा ते बारा वर्षापासून एकच ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना प्राधान्य देण्यात आले आहे. सर्व बदल्या या नियमानुसार व सर्व संवर्गातील आहे.''- श्रीकांत पवार, उपायुक्त, महापालिका.

यांच्या झाल्या बदल्या

- कनिष्ठ लिपिक ५३

- वरिष्ठ लिपिक २१

- दफ्तरी नाईक ०९

- शिपाई ३९

NMC
NMC News : कंत्राटी कामगारांचा भविष्यनिर्वाह निधी गेला कुठे? महापालिकेचे बँक खाते गोठविण्याचा इशारा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.