NMC News: सौर दिव्यांसाठी 2 कोटीचा निधी! 2 जलतरण तलावांवर सौरऊर्जा पॅनल उभारणार

nmc
nmc esakal
Updated on

NMC News : राष्ट्रीय स्वच्छ हवा कृती कार्यक्रमांतर्गत (एन-कॅप) प्राप्त झालेला निधी खर्च होत नसताना आता स्वा. सावरकर जलतरण तलाव व राजमाता जिजाऊ आंतरराष्ट्रीय जलतरण तलाव येथे सौरऊर्जा पॅनल बसविले जाणार आहे.

सौर दिव्यांसाठी एक कोटी ९९ लाख रुपये निधी खर्च केले जाणार आहे. (NMC 2 crore fund for solar lights Solar panels will be installed on 2 swimming pools nashik)

केंद्र सरकारकडून प्रदूषण कमी करण्यासाठी स्वच्छ हवा कार्यक्रम अर्थात ‘एन-कॅप’ योजना राबविली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून महापालिकेला आतापर्यंत जवळपास ८५ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झालेला आहे.

त्या निधीतून विविध प्रकारची कामे सुरू आहेत. महापालिका मुख्यालय, विभागीय कार्यालय तसेच रुग्णालयावर पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) या तत्त्वावर सोलर पॅनलची उभारणी करण्यात आली आहे.

सोलर पॅनल माध्यमातून निर्माण होणारी वीज महापालिकेच्या कार्यालयामध्ये वापरली जाते. या माध्यमातून वीज देयकांची बचत होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता पश्चिम व नाशिक रोड विभागातील दोन जलतरण तलावांवर सौरऊर्जा पॅनलची उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

nmc
NMC News: जितकी झाडे जगली तेवढेच पैसे..! पावसाळ्यानंतर महापालिकेची वृक्षारोपण मोहीम

केंद्र शासनाकडून प्राप्त होणाऱ्या निधीतून स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलाव येथील पंखे, हॅलोजन, विजेचे दिवे, फ्लड लाइट, मोटर तसेच इतर विद्युत करणासाठी ७५ किलो बॅटरी क्षमतेचे व जिजाऊ आंतरराष्ट्रीय जलतरण तलाव येथे १२५ किलो क्षमतेचे सोलर पॅनल बसविले जाणार आहे.

सोलर सिस्टमचे काम पूर्ण झाल्यानंतर ती यंत्रणा सांभाळण्याची जबाबदारी मिळकत विभागाकडे राहणार आहे. सोलर सिस्टम देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी पाच वर्षांसाठी मक्तेदारांवर निश्चित करण्यात आली आहे.

nmc
Nashik News: आयुक्तालय हद्दीत शहरात 26 ऑक्टोबरपर्यंत मनाई आदेश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.