Majhi Vasundhara 3.0: माझी वसुंधरा अभियानात NMC नवव्या स्थानी; आरोग्यसोबतच आता उद्यान विभागदेखील ‘रडार’वर

Majhi Vasundhara 3.0 NMC
Majhi Vasundhara 3.0 NMCesakal
Updated on

Majhi Vasundhara 3.0 : स्वच्छ भारत अभियानात पहिल्या दहा शहरांमध्ये येण्यासाठी नाशिक महापालिकेची दमछाक होत असताना, आता ‘माझी वसुंधरा ३.०’ उपक्रमातदेखील घसरण झाली आहे.

तब्बल नव्या स्थानावर घसरगुंडी झाल्याने आरोग्य विभागासोबतच उद्यान विभागदेखील नाशिककरांच्या रडारवर आला आहे. (NMC 9th position in Majhi Vasundhara Abhiyan Along with health now park department also on radar nashik news)

राज्य शासनातर्फे पर्यावरणाचे संवर्धन, तसेच पंच तत्त्वावर आधारित माझी वसुंधरा अभियान राबविले जात आहे. २ ऑक्टोबर २०२०पासून सुरू असलेल्या या अभियानाचे यंदा तिसरे वर्ष होते. पहिल्या वर्षी राज्यातील ४३ अमृत शहरे, २२२ नगरपरिषदा, १३० नगरपंचायत व २९१ ग्राम पंचायती अशा एकूण ६८६ स्थानिक स्वराज्य संस्थांना यात सहभागी करून घेण्यात आले.

पहिल्या अभियानात नाशिक महापालिका व बार्शी नगरपरिषदेला विभागून पाचवा क्रमांक देण्यात आला होता. त्यामुळे महापालिकेला दीड कोटी रुपयांचे रोख बक्षीस मिळाले होते. अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात नाशिक मनपा थेट विसाव्या स्थानावर फेकल्या गेली.

तिसऱ्या टप्प्यात तुलनेने कमी घसरण झाली असली, तरी स्वच्छ व सुंदर नाशिक अशी बिरूदावली मिरवणाऱ्या नाशिक महापालिकेला नवव्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे. महापालिकांच्या गटात पिंपरी चिंचवडने पहिला, तर नवी मुंबई महापालिकेने दुसरा व पुणे महापालिकेने तिसरे स्थान मिळविले.

नाशिकला ३३१२ गुण

माझी वसुंधरा अभियानात नाशिक महापालिकेला ३ हजार ३१२ गुण मिळाले आहेत. नाशिकसह राज्यातील ४३ अमृत शहरे, ३६८ नगरपरिषद व नगरपंचायती, तसेच अकरा हजार ६२१ ग्रामपंचायती, अशा एकुण १६ हजार ८२४ स्थानिक स्वराज्य संस्थांनी अभियानात सहभाग नोंदविला होता. अमृत गटासाठी सात हजार ६००, तर अन्य गटांसाठी सात हजार ५०० गुण ठेवण्यात आले होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Majhi Vasundhara 3.0 NMC
NMC Promotion : महापालिकेच्या इतिहासातील पदोन्नत्यांचा सर्वात मोठा गैरव्यवहार? घोडे-पाटलांचे कारनामे

माझी वसुंधरा अभियानातील शहरे व गुण

क्रमांक महापालिका मिळालेले गुण

१ पिंपरी चिंचवड ६५४३
२ नवी मुंबई ६३२४
३ पुणे ६१००
४ ठाणे ५५५४
५ औरंगाबाद ४२९५
६ वसई-विरार ४०२८
७ कल्याण-डोंबिवली ४०२८
८ नागपूर ३६७१
९ नाशिक ३३१२
१० बृहन्मुंबई ३२९५

"माझी वसुंधरा अभियानाच्या तिसऱ्या टप्प्यात नाशिक महापालिकेला कमी गुण मिळाले असले, तरी अभियानाच्या चौथ्या टप्प्यांमध्ये प्रभावी योजना राबवून पहिल्या तीन शहरांमध्ये क्रमांक मिळविण्याचा प्रयत्न राहील." -विजयकुमार मुंडे, उपायुक्त, उद्यान विभाग.

Majhi Vasundhara 3.0 NMC
Majhi Vasundhara campaign : औरंगाबाद महापालिका चमकली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.