NMC News : वाढत्या नागरीकरणामुळे ग्रामीण भागाच्या धर्तीवर वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी नाशिक महापालिका हद्दीमध्ये १०६ आरोग्य उपकेंद्रांची निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वप्नातील आपला दवाखाना असे या उपक्रमाचे नामकरण देखील करण्यात आले.
परंतु या आपला दवाखाना महापालिकेच्या लालफितीच्या कारभारात अडकला आहे. आतापर्यंत चुंचाळे शिवारात अवघा एक दवाखाना कार्यरत झाला असून त्या दवाखान्याचा कारभारही रडतखडत सुरू आहे. (NMC Aapla Dawkhana stuck in red file Only one clinic functioning in Chunchale Shivara nashik news)
ग्रामीण भागात जिल्हा परिषद व जिल्हा रुग्णालयामार्फत वैद्यकीय सेवा पुरविली जाते. आरोग्य केंद्र व त्यानंतर उपकेंद्र असा वैद्यकीय सेवेचा स्तर आहे. नाशिक महापालिका हद्दीमध्ये ३० आरोग्य केंद्रे आहेत. त्यापुढे वैद्यकीय सेवा पोचत नाही.
महापालिकेचे रुग्णालय व आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून बाह्यरुग्ण विभागामार्फत वार्षिक ७० हजार रुग्णांची तपासणी होते. तर आंतररुग्ण कक्षामध्ये २५ हजार रुग्णांवर उपचार केले जातात. कोविड पार्श्वभूमीवर आरोग्य सेवा सक्षम करण्याच्या अनुषंगाने ग्रामीण भागाच्या धर्तीवर नाशिक महापालिका हद्दीमध्ये ३० केंद्रांना जोडून १०६ आरोग्य उपकेंद्रांची निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या प्रत्येकी एका केंद्रात एक एमबीबीएस डॉक्टर, एक स्टाफ नर्स, एक बहुउद्देशीय सेवक व एक सहाय्यक अशी नियुक्ती होणार आहे. आरोग्य उपकेंद्रांसाठी महापालिका इमारत व पायाभूत सुविधा पुरविणार आहे.
इमारतींच्या देखभाल व दुरुस्तीचा खर्च महापालिका स्वनिधीतून करेल. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून १०६ उपकेंद्रांची निर्मिती होणार आहे. आरोग्य उपकेंद्राच्या माध्यमातून हायपर टेन्शन, रक्तदाब, मधुमेह, तोंडाचा व गर्भाशय कर्करोग या आजारांवर उपचार केले जाणार आहे.
त्याचबरोबर सर्वेक्षण व उपचार हादेखील महत्त्वाचा भाग असेल. माता व बाल आरोग्य तपासणी या आरोग्य उपकेंद्रांच्या माध्यमातून होईल. परंतु सहा महिन्यात अवघे एक केंद्र उभे राहीले असून, चुंचाळे येथे महापालिकेच्या रुग्णालयात १ मेस सुरू करण्यात आले.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
परंतु, तेथेही अनंत अडचणींचा सामना करावा लागतं आहे. उर्वरित १०५ आरोग्य उपकेंद्रे अद्यापही कागदावरच आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपक्रमाला महापालिकेकडूनच ब्रेक लागल्याचे चित्र आहे.
अशी आहे सद्यःस्थिती
सद्यःस्थितीत १०६ पैकी एक आरोग्य उपकेंद्र तयार झाले आहे. उर्वरित १०५ पैकी ९२ उपकेंद्रांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. ९२ जागा निश्चित करण्यात आल्या असून पैकी ३९ उपकेंद्रांची निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. २७ एमबीबीएस डॉक्टरची निवड झाली असून, केंद्र तयार नसल्याने त्यांना नियुक्ती देता येत नाही. मल्टीपर्पज वर्कर्सचीदेखील निवड करण्यात आली आहे.
नावाचा गोंधळ
१०६ आरोग्य उपकेंद्रांची निर्मिती करताना योजनेच्या नावाचा गोंधळ आहे. तूर्त आरोग्यवर्धिनी असे नाव दिले असले तर याच योजनेत चुंचाळे येथील दवाखाना आपला दवाखाना म्हणून संबोधले जात आहे. उर्वरित १०५ उपकेंद्रांचे काम पूर्ण झाल्यानंतर त्यांनाही आपला दवाखाना असेच संबोधले जाणार आहे.
"१०६ पैकी एक आपला दवाखाना सुरू झाला आहे. उर्वरित दवाखाने निर्मितीची प्रक्रिया बांधकाम विभागाच्या स्तरावर आहे. ९२ दवाखान्याचे अंदाजपत्रक तयार आहे, तर त्यातील ३९ केंद्रांची निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे."
- डॉ. बापूसाहेब नागरगोजे, वैद्यकीय अधिकारी, महापालिका.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.