NMC School Students Welcome: संवाद, निपुणता, लैंगिक शिक्षणाच्या उपक्रमाचा समावेश; डॉ. मिता चौधरी

मनपा विद्यार्थ्यांची गुणवत्ता, आत्मविश्वास वाढविणार
NMC School
NMC Schoolesakal
Updated on

NMC School Students Welcome : महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्याबरोबरच त्यांच्यातील आत्मविश्वास वाढण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी विशेष उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.

त्यात विद्यार्थी व शिक्षकांमध्ये संवाद वाढविण्याबरोबरच तंत्रज्ञानातील निपुणता व लैंगिक शिक्षणाचाही समावेश उपक्रमांमध्ये करण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या प्रशासनाधिकारी डॉ. मिता चौधरी यांनी दिली.

जिल्हा परिषदेसह महापालिका हद्दीमधील खासगी व सरकारी शाळा गुरुवारपासून सुरू झाल्या. त्या पार्श्वभूमीवर शिक्षकासह विद्यार्थ्यांसाठी आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.

गुणवत्तापूर्ण विद्यार्थी तयार व्हावा यासाठी वर्षभर उपक्रम लागू करण्यात आले आहे. त्यात संवाद, निपुणता, सखी, भरारी या उपक्रमांचा समावेश आहे. (NMC Administrative Officer Dr Mita Chaudhary statement Inclusion of communication skills sex education activities nashik)

उपक्रमांची व्याप्ती

* संवाद : विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढण्यासाठी परिपाठानंतर विद्यार्थी वर्गात गेल्यावर रोज वर्गातील एका मुलाला समोर येऊन बोलण्याची संधी देणे. मुलांना व्यक्त होण्याची संधी देणे.

* भरारी : शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची तयारी करून घेणे. यासाठी शिक्षकांची परीक्षा तसेच चर्चासत्र घेणे. पाचवी व आठवीच्या सर्व शिक्षकांनी या वर्षी स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षेची विद्यार्थ्यांकडून तयारी करून घेणे.

* प्रोत्साहन : शिष्यवृत्ती परीक्षेच्या वर्गांना विद्यार्थ्यांना बसवावे. यात मुलांच्या प्रगतीचा आढावा घेणे.

* निपुण : प्रत्येक विद्यार्थ्याला मूलभूत तंत्रज्ञान असणे आवश्यक आहे. त्यामुळे निपुण अंतर्गत विद्यार्थ्यांचे अध्ययन स्तर सर्व शिक्षकांनी निश्चित करून आपल्या विद्यार्थ्यांना ओळखून त्यांच्या गरजेनुसार त्यांना पुढील स्तरावर येण्यासाठी प्रयत्न करावे. निपुणच्या चाचण्या योग्य पद्धतीने घेणे. यात गट पद्धतीचा वापर करावा.

* सखी : सर्व शाळांमध्ये तक्रारपेटी बसविणे. याविषयी माहिती विद्यार्थ्यांना देणे. दर शनिवारी पेटी उघडून मुलांच्या तक्रारीचे निरसन करणे. गंभीर तक्रार असल्यास वरिष्ठ कार्यालयास अवगत करणे.

* लैंगिक शिक्षण : विद्यार्थ्यांसाठी वर्षातून एकदा तज्ज्ञ मार्गदर्शकांमार्फत लैंगिक शिक्षणाविषयी, स्वच्छतेविषयी, आरोग्यविषयक तसेच स्पर्शासंदर्भात माहिती देणे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

NMC School
NMC School : विद्यार्थी गणवेषाचा प्रश्न मार्गी; अनुदान विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर होणार जमा

शाळांमध्ये तक्रार पेटी

‘सखी’ उपक्रमांतर्गत महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये विश्वास निर्माण होण्यासाठी तक्रार पेटी लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तक्रार पेटी संदर्भात सर्व विद्यार्थ्यांना अवगत करून दर शनिवारी तक्रारीची पेटी उघडून तक्रारीचे निरसन करणे बंधनकारक केले जाणार आहे. गंभीर तक्रार प्राप्त झाल्यास वरिष्ठांना अवगत करावे लागणार आहे.

"महापालिकेच्या विद्यार्थ्यांमध्ये संवाद, आत्मविश्वास वाढावा यासाठी वर्षभरासाठी उपक्रम आहेत. लैंगिक शिक्षण तसेच स्वच्छता व आरोग्यविषयक सजगतादेखील महत्त्वाची आहे."

- मिता चौधरी, प्रशासनाधिकारी, महापालिका.

NMC School
NMC School : महापालिकेच्या शिक्षकांना 1 तास Extra! विद्यार्थी टक्का, गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.