NMC News: फास्ट ट्रॅकवर हायड्रोलिक शिडी खरेदी! पूर्वीची वादग्रस्त प्रक्रिया रद्द; 15 दिवसात निविदा प्रक्रिया

hydraulic ladder
hydraulic ladderesakal
Updated on

NMC News : नव्वद मीटर उंचीची हायड्रोलिक शिडी महापालिकेला पुरविणारी कंपनी दिवाळखोरीत निघाल्यानंतर नवीन शिडी खरेदीची प्रक्रिया रद्द करण्यात आली असून तातडीची बाब म्हणून पंधरा दिवसात निविदा प्रक्रिया राबवून शिडी खरेदीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. (NMC Buy hydraulic ladder on fast track Cancellation of previous controversial process Tender process in 15 days nashik)

महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडून यापूर्वी २००८ मध्ये ३२ मीटर उंचीपर्यंत पोचणारी हायड्रोलिक प्लॅटफॉर्म अर्थात शिडी खरेदी करण्यात आली आहे.

महापालिकेला हायड्रोलिक प्लॅटफॉर्म प्राप्त झाल्यानंतर रीतसर प्रादेशिक परिवहन विभागाकडे नोंदणी करण्यात आली. जुलै २०२३ ला प्रादेशिक परिवहन विभागाकडे वाहनाची फिटनेस टेस्ट करण्यात आली.

२०२४ मध्ये पंधरा वर्षे पूर्ण होत असल्याने नोंदणी रद्द होणार आहे. त्यामुळे अग्निशमन विभागाने एकीकृत विकास नियंत्रण नियमावलीच्या आधारे ९० मीटर उंचीपर्यंत पोचणारी हायड्रोलिक शिडी खरेदीचा प्रस्ताव दिला.

फिनलँड येथील मे. वेसा लिफ्ट ओये या कंपनीला नोव्हेंबर २०१८ मध्ये कार्यारंभ आदेश दिले. ३१ मे २०२३ पर्यंत सदर कंपनीकडून पुरवठा केला जाणार होता. कंपनी दिवाळखोरीत निघाल्याने अग्निशमन विभागाला अद्यापपर्यंत हायड्रोलिक शिडी प्राप्त झाली नाही.

hydraulic ladder
Sakal Exclusive : शहरात रस्ता अपघाताचे 9 महिन्यात 150 बळी; हेल्मेट नसल्याने 26 जणांचा मृत्यू

त्यामुळे पूर्वीचा करार रद्द करण्यात आला. त्यामुळे अग्निशमन विभागाने नगररचना विभागाला पत्र लिहून नवीन हायड्रोलिक प्लॅटफॉर्म प्राप्त होण्यास दोन वर्षाचा कालावधी लागणार असल्याने तोपर्यंत ७० मीटर पेक्षा अधिक उंचीच्या बांधकामांना परवानगी देवू नये अशी मागणी नगररचना विभागाकडे केली होती.

त्यानुसार नगररचना विभागाचे सहसंचालक कल्पेश पाटील यांनी ३१ ऑगष्ट २०२३ ला तशा लेखी सूचना अभियंत्यांना दिल्याने नवा वाद निर्माण झाला.

रिअल इस्टेट क्षेत्राचा गळा घोटण्याच्या निर्णयाची आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी तत्काळ दखल घेत निर्णय मागे घेण्याच्या सूचना दिल्याने दिलासा मिळाला.

दरम्यान आयुक्तांनी आता प्रथम जुन्या शिडी खरेदीची प्रक्रिया रद्द केली आहे. नवीन शिडी खरेदीसाठी पुढील पंधरा दिवसात निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे.

hydraulic ladder
Nashik News : करवसुलीसाठी शहराची 2960 ब्लॉकमध्ये विभागणी; करचुकवेगिरी करणाऱ्यांवर होणार कारवाई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.