NMC News: वीजपुरवठा खंडित केल्याचा दावा फोल; धोकादायक वाडे, इमारतींना नोटिशीचा सोपस्कार

NMC News
NMC Newsesakal
Updated on

NMC News : ‘नेमेची येतो पावसाळा’ या उक्तीप्रमाणे महापालिकेच्या नगररचना व बांधकाम विभागाने विभागीय अधिकाऱ्यांमार्फत सहा विभागातील अतिधोकादायक वाडे, इमारतींना नोटिसा पाठवून सोपस्कार पार पाडला आहे.

भाडेकरू व मालक धोकादायक इमारती खाली करत नसल्याने यंदा वीजपुरवठा खंडित केल्याचा दावा करण्यात आला आहे. परंतु वास्तवात कुठेही वीजपुरवठा खंडित करण्यात आलेला नाही.

वीजपुरवठा खंडित करण्याचा महापालिकेला अधिकार नाही. पुरवठा खंडित केला असता तर आक्रोश बघायला मिळाला असता. त्यामुळे सहा विभागातील अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या आकडेवारीचा दावा फोल ठरतो. (NMC Claim of power cut false Notice assignment to dangerous mansion building encroachment nashik news)

महापालिकेकडून दरवर्षी पावसाळ्यापूर्वी धोकादायक वाड्यांना नोटिसा दिल्या जातात. परंतु हा फक्त भविष्यात घडणाऱ्या कारवाईतून सुटका करून घेण्यासाठीचा फार्स असल्याचे आतापर्यंत स्पष्ट झाले आहे.

या वर्षी तत्कालीन आयुक्तांनी वीज व पाणीपुरवठा खंडित करून अतिधोकादायक वाड्यातील रहिवाशांची नाकेबंदी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु मागील महिनाभरात म्हणजे पावसाळा सुरू होण्यापूर्वीच्या कालावधीत महापालिकेला तीन आयुक्त पाहायला मिळाले.

त्यामुळे यापूर्वीच्या आयुक्तांनी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही. आता नवीन आयुक्त भाग्यश्री बानाईत यांनी घेतलेल्या आढाव्यात ४९९ धोकादायक, इमारतींचा पाणी व वीजपुरवठा तोडण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

NMC News
NMC Water Tap Connection: अनधिकृत नळजोडणी नियमितीकरणाला मुदतवाढ

दरम्यान आयुक्तांनी पावसाळापूर्व कामांचा आढावा घेतला. विभागप्रमुखांनी पावसाळापूर्व कामांची प्रत्यक्षात पाहणी करावी. पाण्याचा निचरा होण्यासाठी उपाययोजना कराव्यात, रस्त्यांवरील सर्व खड्डे बुजवावेत, रस्त्यांवरून गटारींचे पाणी वाहू देवू नये, अधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त वेळ कार्यालयात थांबून नागरिकांच्या समस्यांचे वेळेत निराकरण करावे.

महापालिकेकडे प्राप्त तक्रारी, मुख्यमंत्री सचिवालय, पीएम पोर्टलवरील तक्रारी वेळेत निकाली काढण्याच्या सूचना दिल्या.

पोलिस ठाण्यात धोकादायक वाड्यांची यादी

पश्चिम विभागात ३७३ धोकादायक वाड्यांना नोटिसा देण्यात आल्या असून, वीज आणि पाणीपुरवठा खंडित करण्याचे पत्र देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. तर सरकारवाडा, भद्रकाली पोलिस स्टेशनलाही धोकादायक वाड्यांची यादी सादर करण्यात आली आहे.

पूर्व विभागात अतिधोकादायक १७, कमी धोकादायक १४ वाड्यांना नोटिसा देऊन पाणी, वीज कनेक्शन तोडण्यात आले आहे. तर पंचवटी विभागात ९५ वाड्यांना नोटिसा देण्यात आल्या आहेत, अशी माहिती आयुक्तांसमोर सादर करण्यात आली.

NMC News
NMC News: ठेका मुदतवाढीच्या फंड्याला ब्रेक! प्रस्ताव सादर न करण्याच्या प्रभारी आयुक्तांच्या सूचना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()