Nashik News | वायुप्रदुषण नियंत्रणासाठी हवी नागरिकांची साथ : NMC आयुक्‍त डॉ.पुलकुंडवार

NMC Commissioner Dr. Pulkundwar
NMC Commissioner Dr. Pulkundwaresakal
Updated on

नाशिक : केंद्र शासन, राज्‍य शासनापासून महापालिकेच्‍या स्‍तरावर वायुप्रदुषण घटविण्यासाठी विविध योजना राबविल्‍या जाता आहेत. नीरी, टेरी, आआयटी पवई यांच्‍या सहकार्याने प्रदूषण नियंत्रणासाठी विविध उपाययोजना सुरू आहेत.

वायु प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी नागरिकांनीही साथ द्यावी, असे आवाहन महापालिका आयुक्‍त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी बुधवारी (ता. १८) केले. (NMC Commissioner Dr Pulkundwar statement about Citizens support for air pollution control Nashik News)

दी एनर्जी ॲन्ड रिसोर्सेस इन्‍स्‍टिट्यूट (टेरी) यांच्‍यातर्फे व नॅशनल एनव्‍हायर्नमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्‍स्‍टिट्‍यूट (नेरी), महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, नाशिक महापालिकेतर्फे आयोजित कार्यशाळेप्रसंगी ते बोलत होते. ‘वायुप्रदुषण नियंत्रणासाठी माध्यमांची भूमिका’ असा कार्यशाळेचा विषय होता. याप्रसंगी टेरीचे वरिष्ठ अधिकारी आर. सुरेश, नीरीचे वैज्ञानिक राहुल व्‍यवहारे सहभागी झाले होते.

आयुक्‍त डॉ. पुलकुंडवार म्‍हणाले, की वायु प्रदूषणावर नियंत्रणासाठी दोनशे सिटी बस सीएनजीवर कार्यान्‍वित असून, लवकरच इलेक्‍ट्रिक बस अवगत केल्‍या जात आहेत. अंत्‍यविधीसाठी तीन विद्युत शवदाहिनी बसविल्या असून, सीएसआर निधीतून ही संख्या वाढविली जाणार आहे.

शंभर ठिकाणी इलेक्‍ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्‍टेशन उभारणीबाबत जागा निश्‍चित केल्‍या आहेत. मेकॅनिकल झाडूचा वापर केला जाणार आहे. एस. सुरेश म्‍हणाले, की जगातील सर्वाधिक वायु प्रदूषण असलेल्‍या पन्नास शहरांपैकी दहा भारतातील आहेत.

NMC Commissioner Dr. Pulkundwar
Currency Note Press : गांधीनगर मुद्रणालयाचे आधुनिकीकरण; 232 कोटींचा आराखडा तयार

आरोग्‍याचा प्रश्‍न निर्माण होण्यासह कृषी उत्‍पादनांत ३० टक्क्यांपर्यंत घट, अर्थव्‍यवस्‍था प्रभावित होणे असे गंभीर परिणाम उद्‍भवू शकतात. त्यामुळे वायुप्रदुषण घटविण्यासाठी प्रयत्‍न व्‍हावे. संयुक्‍त सर्वेक्षणातून वायु प्रदूषणासाठी कारणीभूत स्‍त्रोतांचा शोध घेण्याचा प्रयत्‍न केला असून, यामुळे प्रदूषण नियंत्रणास मदत होईल.

श्री. व्‍यवहारे म्‍हणाले, की वाहतूक, हॉटेल, रेस्टॉरंट, बेकरी, उद्योग अशा विविध घटकांतून उत्‍सर्जित होणाऱ्या घटकांमुळे वायुप्रदुषण वाढते आहे. प्रदूषण घटविण्यासाठी नागरिकांची भूमिका महत्त्वाची असून, त्‍यांच्‍या जबाबदारीची जाणीव व्‍हावी, यासाठी जनजागृती केली जाते आहे.

या अंतर्गत शनिवारी (ता.२१) सायकल रॅली काढली जाणार असून, पथनाट्यातून जनजागृती केली जाणार आहे. कार्यक्रमाचे समन्‍वय गरिमा कपूर यांनी केले.

हेही वाचा : आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू....

NMC Commissioner Dr. Pulkundwar
Winter Weather Update : वातावरणात गारवा अन् कमाल तापमानात वाढ!

उत्‍सर्जन घटविण्याचे प्रयत्‍न सुरू: बवासे

दृकश्राव्‍य माध्यमातून संवाद साधताना ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाचे सरव्‍यवस्‍थापक डॉ. मोक्‍तिक बवासे म्‍हणाले, की बीएस-६ स्‍तरावरील वाहनांमुळे उत्‍सर्जित विषारी घटकांवर नियंत्रण मिळविण्यात काही प्रमाणात यश येते आहे.

इंधनातील इथेनॉलचे प्रमाण सध्या दहा टक्‍के असून, वाढत व २०२५ पर्यंत २० टक्क्यांपर्यंत नेण्याचे निर्धारित आहे. इलेक्‍ट्रिक वाहनांचे प्रमाण वाढविणे व अन्‍य विविध माध्यमातून वायुप्रदुषण घटविण्याचे प्रयत्‍न सुरू असल्‍याचे नमूद केले.

NMC Commissioner Dr. Pulkundwar
Dr. Amol Kolhe | शिवपुत्र संभाजी महानाट्याचा ‘तनिष्कां’नी करावा प्रचार- प्रसार : अमोल कोल्हे

माध्यम क्षेत्रास माहिती,डेटा उपलब्‍ध व्‍हावा

समूह चर्चेसाठी झालेल्‍या सत्रात ‘सकाळ’ उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक डॉ. राहुल रनाळकर, देशदूतच्‍या संपादिका वैशाली बालाजीवाले, लोकमतचे संपादक मिलिंद कुलकर्णी, लोकमत टाईम्‍सचे संपादक रिकिन मर्चंट यांच्‍यासह महाराष्ट्र टाईम्स'चे सौरभ बेंडाळे यांनी सत्रात सहभाग नोंदविला.

विविध शासकीय आस्‍थापनांकडून अचूक व सविस्‍तर माहिती, डेटा उपलब्‍ध व्‍हावा, अशी अपेक्षा या वेळी व्‍यक्‍त केली. प्रदूषण नियंत्रणासाठी प्रशासकीय यंत्रणेच्‍या प्रयत्‍नांना माध्यम क्षेत्राकडून नेहमीच पाठबळ दिले जाईल, अशी ग्‍वाही या वेळी दिली. व्‍यापक जनजागृतीसाठी शाळकरी मुलांपासून ज्‍येष्ठ नागरिकांपर्यंत स्‍वयंसेवकांची फळी निर्माण करण्याची गरज डॉ. रनाळकर यांनी व्‍यक्‍त केली.

NMC Commissioner Dr. Pulkundwar
Nashik News : नाशिक, निफाड, सिन्नरमध्ये आवर्तनावेळी वीज खंडीत होणार!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.