NMC Commissioner : नेमका वास्तुदोष की दुरुस्ती? महापालिका आयुक्त यांच्या बंगल्यावरून विविध चर्चा

Dr. Ashok Karanjkar
Dr. Ashok Karanjkaresakal
Updated on

NMC Commissioner : महापालिका आयुक्तांच्या बंगल्याला सध्या वास्तुदोषाने घेरले आहे. त्यामुळेच विद्यमान आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी बंगल्यात वास्तव्य न करता खासगी फ्लॅटमध्ये राहण्याचा निर्णय घेतल्याच्या चर्चेने राखी पौर्णिमेच्या दिवशी चर्चेला उधाण आले.

मात्र, आयुक्तांनी वृत्ताचा इन्कार केला असून, वास्तुदोष वगैरे काही नाही. बंगल्यात दुरुस्ती करावयाची असल्याने खासगी फ्लॅट घेऊन राहत असल्याचा खुलासा केला.

महापालिका आयुक्तांचा गडकरी चौकात असलेला बंगला पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे. या वेळेची चर्चा मात्र वास्तुदोषाची आहे. यापूर्वी आयुक्तांचा बंगला विविध कारणांमुळे चर्चेत आला. (NMC Commissioner living in private flat as bungalow needed to be repaired nashik news)

कृष्णकांत घुगे आयुक्त असताना बंगल्यात चोरी झाली होती. भास्कर सानप आयुक्त असताना चोरांनी वरच्या मजल्यावर डल्ला मारला होता.

अभिषेक कृष्णा आयुक्त असताना पार्टीमुळे बंगला चर्चेत आला होता. डॉ. प्रवीण गेडाम आयुक्त असताना बंगल्यात कर्मचाऱ्यांची रात्रभर लावलेली ड्यूटी चर्चेत आली होती. तुकाराम मुंढे आयुक्त असताना शहरात अतिक्रमित बांधकामांवर हातोडा मारत होते, मात्र दुसरीकडे आयुक्त बंगल्यातच चुकीच्या पद्धतीने काम करून नगररचनेच्या नियमांचे उल्लंघन झाल्याची चर्चा होती.

कैलास जाधव आयुक्त असताना आयुक्त बंगल्याचे नामकरण व अवेळी अधिकाऱ्यांचा राबता चर्चेत आला. आता वास्तुदोषामुळे बंगला चर्चेत आला आहे. आयुक्तांच्या बंगल्यात वास्तुदोष असल्याने प्रगती होत नाही, येथे विविध प्रकारच्या कटकटींना सामोरे जावे लागते, तीन वर्षांपेक्षा अधिक काळ आयुक्त येथे टिकत नाही.

या कारणांमुळे विद्यमान आयुक्त डॉ. करंजकर यांनी बंगल्यात वास्तव्य करण्याचे सोडून खासगी फ्लॅटमध्ये ते वास्तव्याला गेले आहेत, अशी चर्चा दिवसभर शहरात होती. परंतु, आयुक्त करंजकर यांनी अशा चर्चांना पूर्णविराम देताना, आयुक्त बंगल्यात दुरुस्तीची कामे काढल्याने खासगी फ्लॅटमध्ये वास्तव्याला जावे लागल्याचा खुलासा केला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Dr. Ashok Karanjkar
Sharad Pawar News : संघटन बांधणीतही शरद पवारांचे लक्ष जिल्ह्याच्या कांद्याकडे; नाशिकमध्ये लवकरच बैठक

मुख्यालयातही वास्तुदोष?

महापालिकेच्या मुख्यालयातही वास्तुदोष असल्याची चर्चा काही वर्षांपूर्वी होती. त्यामुळे मुख्यालय हलविण्याची तयारी सुरू होती. महापालिका मुख्यालय नाल्यावर उभारले आहे. नाल्यावर उभारणे हिंदू धर्मात अशुभ मानले जाते. मुख्यालयाच्या तळघरातही पाणी साचते. तळघरात पाणी साचणे हेही अशुभ मानले जाते.

त्यामुळेच महापालिकेची भरभराट होत नसल्याचा समज काही वर्षांपूर्वी करून काही माजी नगरसेवकांनी मांत्रिक आणण्याचाही सल्ला दिला होता. रामायण बंगल्यावर महापालिकेच्या आर्थिक भरभराटीसाठी केलेले होमहवनही चर्चेत आले.

महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी स्थायी समितीचे कार्यालय विशिष्ट दिशेला हलविण्याची अजब चर्चा समितीच्या सभागृहात ऐकायला मिळाली. आता महापालिका आयुक्तांचे सरकारी बंगला सोडून खासगी फ्लॅटमधील वास्तव्य चर्चेत आले.

Dr. Ashok Karanjkar
NMC News: औद्योगिक करवाढीचा मुद्दा महापालिकेकडे! राज्य शासन नगर विकास विभागाचे पत्र

"आयुक्तांच्या बंगल्यात किरकोळ दुरुस्तीमुळे मी खासगी फ्लॅटमध्ये वास्तव्याला गेलो आहे. काम झाल्यावर मी पुन्हा बंगल्यात वास्तव्याला जाणार. चुकीच्या पद्धतीने चर्चा सुरू आहे." - डॉ. अशोक करंजकर, आयुक्त, नाशिक महापालिका

"वास्तुदोषांमुळे आयुक्त सरकारी बंगला सोडून खासगी फ्लॅटमध्ये वास्तव्याला जात असतील तर हा अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा प्रकार आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा या कृतीला विरोध असून, महापालिकेची वास्तू अत्यंत सुंदर आहे.

वास्तूला पारितोषिकही मिळाले असताना जर वास्तुदोषाचे कारण देऊन वास्तू बदनाम होत असेल तर ते सहन केले जाणार नाही. याविरोधात ‘अंनिस’ आंदोलन करेल." - कृष्णा चांदगुडे, कार्यवाह, महाराष्ट्र ‘अंनिस’

Dr. Ashok Karanjkar
Drought News : खानदेशात कोरडा दुष्काळ जाहीर करावा; आ. रावल यांची मुख्यमंत्री शिंदेंशी चर्चा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.