अतिक्रमण हटवून रस्त्याचे काम सुरू करण्याचे आयुक्तांचे आदेश

रस्त्याची पाहणी करताना आयुक्त रमेश पवार व अधिकारी
रस्त्याची पाहणी करताना आयुक्त रमेश पवार व अधिकारीesakal
Updated on

सिडको (नाशिक) : आयुक्त रमेश पवार यांनी अधिकाऱ्‍यांसमवेत सिडकोमधील त्रिमूर्ती चौक ते माऊली लॉन्स रस्त्याची पाहणी करून ठिकठिकाणी झालेल्या अतिक्रमणाबाबत नापसंती व्यक्त करून हे अतिक्रमण तातडीने हटवून या रस्त्याचे काम सुरू करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. रस्ता रुंदीकरणाचे काम अनेक महिन्यांपासून सुरू आहे. अतिशय रहदारीचा रस्ता असल्याने पावसाळ्यापूर्वी काम होणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र, काही वजनदार व्यक्तींचे अतिक्रमण मनपाच्या अधिकाऱ्यांनी न हटविल्याने या विकासकामाला विलंब होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला होता.

वाढत्या तक्रारींची दखल घेत आयुक्त पवार यांनी या रस्त्याची पाहणी करीत अतिक्रमण हटवून काम सुरू करण्याचे आदेश दिले. अंबड औद्योगिक वसाहतीला जोडला जाणारा मुख्य रस्ता आहे. हा रस्ता रुंदीकरण होऊन वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी, अशी अनेक दिवसांची नागरिकांची मागणी होती. हाच संदर्भ लक्षात घेऊन माजी नगरसेवक तथा शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर आणि माजी नगरसेविका हर्षा बडगुजर यांनी पाठपुरावा करीत मोठा निधी मिळवत कामाला मंजुरी मिळवत रस्ता रुंदीकरणास सुरवात केली.

रस्त्याची पाहणी करताना आयुक्त रमेश पवार व अधिकारी
Nashik : 450 कोटींच्‍या कामांवर आयुक्‍तांनी मारली फुली

या रस्त्याच्या विकासकामात येणारे अनेक अतिक्रमणे हटविण्यात आली. मात्र, काही बड्या राजकीय व सामाजिक नेत्यांच्या असलेल्या अतिक्रमणांवर हातोडा चालविण्यास दुर्लक्ष केले गेले. त्यामुळे एकीकडे रस्ता रुंदीकरण होत असताना दुसरीकडे असलेल्या अतिक्रमणामुळे रस्त्यांचे काम रखडले होते. आयुक्तांनी सर्व अधिकाऱ्यांचा फौजफाटा घेऊन पाहणी दौरा केला. या वेळी सर्व अतिक्रमणे बघून तीव्र नाराजी व्यक्त करून तत्काळ ही अतिक्रमण हटवून काम सुरू करण्याचे आदेश दिले. दरम्यान, आयुक्तांनी घेतलेल्या निर्णयाबाबत श्री. बडगुजर यांनी समाधान व्यक्त केले. हे काम लवकर पूर्ण होईल अशी खात्री व्यक्त केली आहे.

रस्त्याची पाहणी करताना आयुक्त रमेश पवार व अधिकारी
रोबोटद्वारे ड्रेनेजलाइनची स्वच्छता; शहराच्या विविध भागात प्रात्यक्षिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.