महापालिकेत यापुढे 1 तारखेलाच वेतन : आयुक्त रमेश पवार

nmc commissioner ramesh pawar about payment of nmc workers
nmc commissioner ramesh pawar about payment of nmc workersesakal
Updated on

नाशिक : महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांचे दरमहा १ तारखेलाच वेतन (Payment) करण्यात यावे, असे निर्देश महापालिका आयुक्त रमेश पवार (NMC commissioner Ramesh Pawar) यांनी दिले. म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने सातत्याने पाठपुरावा केल्याने त्यांच्या या मागणीला यश आले. (NMC Commissioner Ramesh Pawar Statement about nmc workers payment nashik news)

महापालिकेत बायोमेट्रिक हजेरी १ तारखेपासून ते ३०/३१ तारखेपर्यंत घेऊन पुढील महिन्याच्या १ तारखेस हजेरीपत्रक संबंधित विभागाकडून प्राप्त झाल्यानंतर पे रोल रन करून साधारणत: चार ते पाच दिवस लेखा विभागाकडून त्यावर प्राप्तिकर कपात व इतर कपातींचा ताळमेळ घेऊन साधारणत: ५ ते ७ तारखेस वेतन होते. अधिकारी व कर्मचारी यांची बायोमेट्रिक हजेरी, सेल्फी हजेरी जून २०२२ च्या १ तारखेपासून ते २० तारखेपर्यंत घ्यावी. पुढील दहा दिवस कर्मचारी हजर असल्याचे गृहीत धरावे. मात्र याबाबतीत २१ ते ३० या दिवसांत प्रत्यक्ष बायोमेट्रिक, सेल्फी प्रणालीवर हजेरी, गैरहजर, रजा, विनापरवाना गैरहजर, मृत, स्वेच्छानिवृत्तीबाबत संबंधित बिल लिपिक व खातेप्रमुखांनी कार्यवाही करावी.

nmc commissioner ramesh pawar about payment of nmc workers
पावसाळ्यातही 53 गावे-वस्त्यांची टँकर भागवताय तहान!

जे कर्मचारी दहा दिवस हजर असल्याचे गृहीत धरले आहे, त्यात कर्मचारी गैरहजर, रजेवर असल्यास ते गैरहजर, रजेचे दिवस पुढील महिन्याच्या हजर दिवसांतून बायोमेट्रिक प्रणालीत समायोजित करण्यात यावेत व त्यानुसार त्या कर्मचाऱ्याचे वेतन काढण्यात यावे. सर्व अधिकारी व कर्मचारी यांची बायोमेट्रिक हजेरी २० तारखेपर्यंत घेऊन त्यानंतर त्या महिन्याच्या २१ तारखेपासून ते पुढील महिन्याच्या २० तारखेपर्यंत हजेरीपत्रक घेऊन संपूर्ण ३०/३१ दिवसांचे वेतन द्यावे. दर महिन्याच्या २२ तारखेपर्यंत हजेरीपत्रक संबंधित विभागाकडून प्राप्त झाल्यानंतर लेखा विभागाने पेरोल रन करून त्यावर प्राप्तिकर कपात व इतर कपातींचा ताळमेळ घेऊन मासिक वेतन १ तारखेस सुटी असल्यास लगतच्या दुसऱ्या देण्याची कार्यवाही करावी. सर्व विभागांतील बिल लिपिकांनी याविषयी प्रशिक्षण घेऊन त्यानुसार जुलैपासून १ तारखेलाच वेतन होईल याची काळजी घेण्याच्या सूचना आयुक्‍तांनी दिल्या.

nmc commissioner ramesh pawar about payment of nmc workers
नाशकात धो-धो : मुसळधार पावसाने नागरिकांची फजिती; पाहा Photos

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.