Nashik Smart City : स्मार्टसिटी प्रकल्पांचा गाजावाजा शहरापुरताच! राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग नाही

NMC & Smart City Nashik News
NMC & Smart City Nashik Newsesakal
Updated on

Nashik Smart City : नाशिक मुनिसिपल स्मार्टसिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन कंपनीने राष्ट्रीय स्मार्टसिटी पुरस्कार-२०२२ स्पर्धेत सहभागच नोंदविला नसल्याची बाब समोर आली आहे. या वर्षीच्या स्पर्धेमध्ये इंदूर शहराने प्रथम क्रमांक पटकाविला.

सुरत आणि आग्रा ही शहरे अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत. नाशिक स्मार्टसिटी कंपनीने स्पर्धेत सहभाग न घेतल्याने प्रकल्पांचा गाजावाजा फक्त शहरापुरताच मर्यादित राहिला आहे. (nmc company did not participate in national competition smart city nashik news)

वाढत्या शहरांमध्ये पायाभूत सुविधांचा ताण निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने २०१५ पासून स्मार्टसिटी ही संकल्पना अमलात आणण्यास सुरवात केली. राज्य सरकारच्या मदतीने नाशिक महापालिकेचा स्मार्टसिटी कंपनीत समावेश करण्यात आला. स्मार्टसिटी कंपनीच्या माध्यमातून नाशिक महापालिका क्षेत्रात ५२ प्रकल्पांची घोषणा करण्यात आली.

स्मार्टसिटीची निर्मिती झाल्यापासूनच प्रकल्प वादात राहिले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सत्ताकाळात काही प्रकल्प राबविले गेले, तेच प्रकल्प स्मार्टसिटी कंपनीमार्फत झाल्याचे दाखविले गेले. बोटावर मोजणे इतके प्रकल्प सोडले तर स्मार्टसिटीचा भव्यदिव्य असा एकही प्रकल्प झाला नाही. सध्या गावठाण विकास योजना व गोदावरी घाटांचे सुशोभीकरण हे प्रकल्प सुरू आहे.

जे काही प्रकल्प झाले ते देशपातळीवर नेऊन स्मार्टसिटीला गाजावाजा करता आला असता. मात्र स्मार्टसिटी कंपनीच्या स्पर्धांमध्ये नाशिकच्या कंपनीने सहभाग घेतल्या नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

NMC & Smart City Nashik News
Talathi Bharti Copy Case : वनविभागाचाही पेपर ‘गुसिंगे’ने फोडल्याची शक्यता...

दर वर्षी राष्ट्रीय स्मार्टसिटी पुरस्कारांची घोषणा केली जाते. देशभरातून या वर्षी ८४५ शहरांनी सहभाग घेतला. बारा विविध गटांत स्पर्धा झाली.

६६ अंतिम विजेत्यांची निवड करण्यात आली. यात महाराष्ट्रातील पिंपरी चिंचवड शहराला प्रशासन श्रेणीत स्मार्ट ॲपसाठी, तर पश्चिम विभागातील विभागीय स्मार्ट शहराचा पुरस्कार सोलापूर शहराला देण्यात आला आहे. २७ सप्टेंबरला इंदूर येथे राष्ट्रपती द्रौपदी मूर्म यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण होईल.

"स्मार्टसिटी पुरस्कारांसाठी २०२१ मध्ये नॉमिनेशन मागविण्यात आले होते. स्पर्धेतील बारा कॅटेगिरीमध्ये नाशिक स्मार्टसिटी कंपनी नसल्याने सहभाग घेता आला नाही. २०२३ च्या स्पर्धेत सहभाग घेतला आहे." - सुमंत मोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्टसिटी कंपनी

NMC & Smart City Nashik News
Nashik News : 2 उपमुख्यमंत्र्यांप्रमाणे आम्हाला देखील हवे.... दिंडोरी गावाची अजब मागणी!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.