NMC Website Hijack : महापालिकेचा Data Hackचा प्रयत्न उधळला

NMC Website Hack News
NMC Website Hack Newsesakal
Updated on

नाशिक : महापालिका हद्दीतील नागरिकांसह, कर्मचारी व पालिकेशी संबंधित महत्त्वाचा डेटा क्रॅक करून संपूर्ण संगणक यंत्रणा ठप्प करण्याचा एका अमेरिकन हॅकर्सचा प्रयत्न आयटी विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नानंतर हाणून पडला. गेल्या आठवड्यात संगणक यंत्रणा हॅकचा प्रयत्न झाला.

आठवडाभर वाच्यता झाली नाही. महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकूंडवार यांनी मात्र सायबर पोलिसात तक्रारीची सूचना दिल्यानंतर घटनेची वाच्यता झाली. फायर वॉलवर चोवीस तास टकटक करून त्रस्त करणाऱ्या हॅकर्सला पळवून लावण्यास चोवीस तासांची आयटी कर्मचाऱ्यांची झुंज कामी आली. (NMC Data Hack Attempt Failed Nashik Latest Crime Marathi News)

महापालिकेच्या एकूण ४३ विभागांचे संपूर्ण संगणकीकरण झाले नसले तरी महत्त्वाचे विभाग मात्र संगणकाने जोडले गेले आहेत. संगणकीय कामकाजासाठी महापालिकेत आयटी विभागाची निर्मिती करण्यात आली आहे. आयटी विभागाच्या माध्यमातून संपूर्ण यंत्रणेवर नियंत्रण ठेवले जाते. मागील आठवड्यात संगणक विभाग म्हणजे आयटी विभागाने केलेल्या शर्थीच्या प्रयत्नांना यश आले.

संगणक नेटवर्कमध्ये व्हायरस घुसल्याने चोवीस तास संगणकीय यंत्रणा ठप्प झाली होती. विशेष म्हणजे सुट्टीच्या दिवशी हा प्रकार घडल्याने फारशी वाच्यता झाली नाही. परंतु व्हायरस हटविणे देखील महत्त्वाचे होते. त्यासाठी आयटी विभागाची संपूर्ण यंत्रणा कामाला लागली. आयटी विभागाच्या यंत्रणेने चोवीस तास हॅकर्सशी लढा देवून पळवून लावले. ग्लोबल आयपी ॲड्रेस तपासणी नंतर अमेरिकन हॅकर्स असल्याचे लक्षात आले.

संगणक नेटवर्क मध्ये घुसलेला व्हायरस हटविला नसता तर महापालिकेचे मोठे नुकसान झाले असते. संगणकामध्ये महापालिकेचे कर्मचारी तसेच शहरातील नागरिकांचा महत्त्वपूर्ण डेटा ठेवण्यात आला आहे. तो डेटा स्क्रीनवर दिसतं असला तरी ऑपरेट करता आला नसता. महापालिकेच्या महसुलासंबंधीच्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता होती. संगणक नेटवर्कमध्ये व्हायरस घुसविण्यात आल्याची माहिती समोर आल्यानंतर हटविण्याचे काम हाती घेण्यात आले. त्यासाठी चोवीस तास लागले.

NMC Website Hack News
Armyतर्फे गोळीबाराची प्रात्याक्षिके; प्रतिबंधित क्षेत्रात जाण्यास सक्त मनाई

फायरवॉलवर असंख्य हिट्स

संगणकावरील डेटा सुरक्षित ठेवण्याचे काम फायरवॉलच्या माध्यमातून होते. हॅकर्सकडून फायरवॉल वर सातत्याने हिट्स दिल्या जातात. त्यात फायरवॉल क्रॅक होते. क्रॅक झाल्यानंतर फायरवॉल पूर्णपणे दुरुस्त करावा लागतो. अटी व शर्ती पुन्हा नव्याने अपडेट कराव्या लागतात. संपूर्ण संगणकांचे स्वरूप पूर्ववत करावे लागते. (फॉरमॅट करणे) ग्लोबल आयपी ॲड्रेस वापरून व्हायरस सोडले जात असल्याने हॅकर सापडणे अशक्य असते.

"महापालिकेच्या संगणक नेटवर्कमध्ये व्हायरस हटविण्याचे काम चोवीस तास सुरु होते. आयटी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मेहनत घेऊन हॅकर्स व व्हायरस हटविला. ही बाब कौतुकास्पद आहे."

- डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, आयुक्त, महापालिका.

NMC Website Hack News
Project Durga : कुटुंबातील सदस्‍यांच्‍या सतर्कतेने यशस्‍वी उपचार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.