नाशिक : कोरोनाची संभावित तिसरी लाट (Third wave of Corona लहान मुलांच्या दृष्टीने घातक असल्याची शक्यता वर्तविल्याने तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी महापालिकेने तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून खासगी बालरोग रुग्णालयांमध्ये (Pediatric hospitals) असलेल्या एकूण बेडसंख्येच्या २५ टक्के बेड आरक्षित करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त कैलास जाधव (Mayor Kailas Jadhav) यांनी दिल्या. (NMC decides to reserve 25 percent beds in Pediatric hospitals in Nashik)
२५ टक्के बेड कोरोनाबाधित बालरुग्णांसाठी
राज्य शासनाने सप्टेंबर ते ऑक्टोबर या महिन्यांत तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली आहे. तिसरी लाट यापेक्षा भयानक राहणार असून, लहान मुलांना अधिक बाधक ठरणार असल्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील बालरोग रुग्णालयांमध्ये लहान मुलांसाठी कोरोना रुग्णालय सुरू करण्याच्या दृष्टीने नियोजनासाठी मंगळवारी (ता. ११) महापालिका मुख्यालयात बैठक झाली. बिटको रुग्णालयात १०० बेडचे रुग्णालय सुरू करण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना संबंधित विभागास दिल्या आहेत. तसेच शहरातील बालरोगतज्ज्ञांकडील रुग्णालयांमध्ये असणाऱ्या एकूण बेडसंख्येच्या २५ टक्के बेड कोरोनाबाधित बालरुग्णांसाठी आरक्षित ठेवण्याच्या सूचना आयुक्त जाधव यांनी दिल्या. रुग्णसंख्या वाढल्यास टप्प्याटप्प्याने बेडच्या संख्येत वाढ करण्यात येणार आहे. या वेळी बालरोगतज्ज्ञांकडून शहरातील हॉस्पिटलची संख्या, बेड व त्यांच्याकडे उपलब्ध व्हेंटिलेटरबाबतची माहिती घेण्यात आली. ज्या हॉस्पिटलकडे ५० बेड किंवा त्यापेक्षा जास्त बेडची व्यवस्था आहे, त्यांनी स्वतंत्र ऑक्सिजन प्लांट तयार करावेत. महापालिकेच्या सीबीआरएस सिस्टिम वारंवार अपडेट करून सर्व माहिती उपलब्ध करावी, भविष्यातील नियोजन म्हणून लहान बालकांना कोरोना झाल्यास कोणत्या पद्धतीचे उपचार करावेत, त्यांना कोणते व्हॅक्सिन द्यावे किंवा त्याबाबतच्या उपचाराचा प्रोटोकॉल याबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली. बैठकीस आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, कोरोना कक्ष अधिकारी डॉ. आवेश पलोड, सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत शेटे, महापालिकेचे बालरोगतज्ज्ञ डॉ. बाजी, आयएमए संघटनेचे अध्यक्ष हेमंत सोननीस, सचिव कविता गाडेकर, पेडियाट्रिक असोसिएशनच्या सचिव रीना राठी आदी उपस्थित होते.
तिसऱ्या लाटेचा सामना करण्याच्या तयारीचा भाग म्हणून बालरोग रुग्णालयांमध्ये २५ टक्के खाटा आरक्षित ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर ५० पेक्षा अधिक बेड असलेल्या रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन प्लांट बसविण्याच्या सूचना दिल्या आहेत.
-कैलास जाधव, आयुक्त, महापालिका
(NMC decides to reserve 25 percent beds in children hospitals in Nashik)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.