Nashik Water Cut : जायकवाडीसाठी नाशिकच्या गंगापूर धरणातून पाणी सोडण्यात आल्याने महापालिकेचे पाणी आरक्षण कमी होणार आहे पाणी आरक्षण कमी झाल्यानंतर नाशिकमध्ये पाणी कपात देखील अटळ राहणार आहे. ( nmc Demand Department of Water Resources to give water reservation as of last year nashik news)
त्या पार्श्वभूमीवर राजकीय दबाव वाढत असल्याने महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी (ता.३०) जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेत किमान मागच्या वर्षी इतके म्हणजेच ५७५० दशलक्ष घनफूट पाण्याचा वापर केला, इतके पाणी आरक्षित करण्याची मागणी केली.
महापालिकेच्या मागणीचा विचार झाल्यास नाशिककरांवर वरचे पाणी कपातीचे संकट कमी होण्याची शक्यता आहे.
नाशिक व नगरच्या धरणातून ८.६ टीएमसी पाणी सोडण्यात आले काही प्रमाणात पाणी सोडल्यानंतर पाऊस झाला त्यामुळे पाणी वहन तूट कमी झाले महापालिकेने पाणी आरक्षणाची सहा हजार १०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षण मागणी नोंदविले आहे.
जलसंपदा विभागाने ५३०४ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षण उपलब्ध करून देण्याचे स्पष्ट केल्यानंतर पाणी कपात अटळ राहणार आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी जलसंपदा विभागाचे अधिकाऱ्यांची भेट घेत मागील वर्षी ५७५० दशलक्ष घनफूट पाण्याचा वापर झाला किमान तितके आरक्षण मिळावे, अशी गळ घातली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.