Nashik : गुणवत्ता- नियंत्रण विभागाच्या कारभारामुळे NMC बदनाम

NMC News
NMC News esakal
Updated on

नाशिक : शहरातील रस्त्यांवर जीवितहानी झाली आहे, त्याला गुणवत्ता व नियंत्रण विभागाचा भोंगळ कारभार जबाबदार आहे. मात्र या विभागाचे कामकाज फक्त खड्डेमय रस्त्यांच्या चौकटी पुरतेच मर्यादित नसून ड्रेनेज, पाणीपुरवठा व उद्यान विभागाच्या स्थापत्य विषयक कामाशीदेखील निगडित आहे. या विभागातील अधिकाऱ्यांची वाढलेली टक्केवारी सुमार गुणवत्तेचे प्रदर्शन करणारे ठरत आहे.

नाशिक महापालिकेच्या स्थापत्य विषयक कामांची गुणवत्ता तपासण्याचे काम गुणवत्ता व नियंत्रण विभागाकडे आहे. या विभागाकडे कामांची गुणवत्ता तपासण्याची जबाबदारी आहे. परंतु, शहरातील रस्त्यांसह स्थापत्य विषयक कामांची झालेली वाहतात होण्यामागे गुणवत्ता व नियंत्रण हाच विभाग कारणीभूत असल्याचे दिसून येत आहे. या विभागात 0.20 पासून ते दोन इथपर्यंत टक्केवारीचे गणित पोचल्याने विविध प्रकारची कामे घेतलेले ठेकेदार मेटाकुटीला आले आहे. त्यातून रस्त्यांसह बांधकामाच्या विविध कामांची गुणवत्ता बिघडली असल्याचे बोलले जात आहे. (NMC discredited due to quality control department management Nashik Latest Marathi News)

NMC News
Dasara 2022 : बाजारपेठेचे सीमोल्लंघन; दसऱ्याचा मुहूर्त साधत ग्राहकांकडून खरेदी

टक्केवारी वाढली

महापालिकेत एकच गुणवत्ता नियंत्रण विभाग आहे. या विभागाच्या अंतर्गत ड्रेनेज, उद्यान, पाणीपुरवठा या विभागात होणाऱ्या बांधकामांचे गुणवत्ता नियंत्रण केले जाते. तथापि, गेल्या वर्षभरापासून या विभागात होणाऱ्या कामांची गुणवत्ता कमालीची ढासळली आहे.

नॉन टेक्निकल व्यक्तींकडून तपासणी

- गुणवत्ता तपासणी करण्यासाठी आयटीआय किंवा नॉन टेक्निकल लोकांकडून गुणवत्ता तपासणी करून घेतली जाते. वास्तविक या सगळ्या तपासण्या डिप्लोमा होल्डर किंवा पदवीधारकांकडून व्हायला हवी. ज्यांना त्या क्षेत्रातील मूलभूत माहितीच नाही, असे लोक जर गुणवत्तेचा दर्जा तपासत असतील, तर कामांचा अचूक दर्जा तपासली जाण्याची शक्यता मावळते.

NMC News
Vijayadashami 2022 : सोने खरेदीसाठी नाशिककरांची एकच गर्दी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.