NMC Drainage Cleaning: ‘एन-सीटू’ तंत्रज्ञानानुसार 5 नाले होणार प्रदूषणमुक्त! आयआयटी पवईचे पथकाकडून आराखडा

NMC News
NMC News esakal
Updated on

NMC Drainage Cleaning : सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी गोदावरीसह उपनद्या प्रदूषणमुक्त करताना नैसर्गिक नालेदेखील प्रदूषणमुक्त केले जाणार आहे. त्यासाठी शहरातील १९ नाले निश्चित करण्यात आले असून, त्यातील पाच नाले पहिल्या टप्प्यात प्रदूषणमुक्तीसाठी निवडण्यात आले आहे.

नाल्यांच्या प्रदूषण मुक्तीसाठी आराखडा तयार केला जाणार असून, त्यासाठी पवई आयआयटीचे पथक पुढील आठवड्यात नाशिकमध्ये येत आहे. (NMC Drainage Cleaning 5 drains will pollution free according to N situ technology Plan by IIT Powai team nashik news)

मुंबईच्या मिठी नदीच्या धर्तीवर गोदावरी व उपनद्या प्रदूषणमुक्त करण्यासाठी पवई आयआयटीची मदत घेतली जात आहे. जानेवारी महिन्यात पथकाने महापालिका हद्दीतील काही नाल्यांची पाहणी केली.

चिखली नाला, कार्बन नाला, चोपडा नाला, मल्हारखान नाला, बजरंग नाला, भारतनगर, पुणे रोडवरील बजरंगवाडी, फेम चित्रपटगृहामागील नाला, सुंदरनगर, रोकडोबावाडी नाला, चेहेडी अशा १९ ठिकाणच्या नैसर्गिक नाल्यांची पाहणी केली.

नाल्यांमधील सांडपाण्याचा फ्लो व सांडपाण्याचे नमुने पथकाने घेतले. प्राथमिक सर्वेक्षणानंतर पथकाने पूर्व व्यवहार्यता तपासणी अहवाल महापालिकेला सादर केला. प्राथमिक अहवालानंतर नैसर्गिक नाल्यांमधून वाहणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करण्याची मागणी पवई आयआयटीकडे नोंदविण्यात आली होती.

त्यानुसार पवई आयआयटीने सर्वाधिक प्रदूषित आढळलेल्या चिखली, डोबी, वाघाडी, विजय ममता नाला या पाच नैसर्गिक नाल्यांच्या प्रदूषणमुक्तीचा निर्णय घेतला असून, ‘एन- सीटू’ तंत्रज्ञानाच्याच्या आधारे सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचे काम केले जाणार आहे. प्रयोग यशस्वी झाल्यानंतर नैसर्गिक नाल्यातील सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

NMC News
Trimbakeshwar Temple: 'नाशिकमधील 'ती' मशीद नसून नाथ सांप्रदायातील मंदिर', अनिकेत शास्त्रींच्या दाव्याने खळबळ

असे होईल काम

- प्रदूषणमुक्तीसाठी आयआयटी पवईचे तंत्रज्ञान.

- पाचही नैसर्गिक नाल्यांची उगमापासून ते नदीपात्रापर्यंतच्या प्रवासाची पाहणी.

- प्रदूषण होणारी ठिकाणांची निश्चिती.

- एन- सीटू प्रकल्पासाठी जागा निश्चिती.

- एन- सीटू प्रकल्पासाठी डिझाईन तयार करणे.

- महापालिकेला सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करणे.

"१९ पैकी पहिल्या टप्प्यात पाच नैसर्गिक नाले प्रदूषण एन- सीटू तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मुक्त केले जाणार आहे. त्यासाठी पवई आयआयटीची मदत घेतली जाणार आहे."

-शिवकुमार वंजारी, शहर अभियंता, महापालिका.

NMC News
Trimbakeshwar Temple: 'नाशिकमधील 'ती' मशीद नसून नाथ सांप्रदायातील मंदिर', अनिकेत शास्त्रींच्या दाव्याने खळबळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.