NMC Election : OBCसाठी 36 जागा राखीव

NMC latest marathi news
NMC latest marathi newsesakal
Updated on

नाशिक : सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण मान्य केल्यानंतर महापालिका निवडणुकीत (NMC Election) ४४ प्रभागांमध्ये १३३ जागांपैकी २७ टक्के आरक्षणानुसार ३६ जागा ओबीसीसाठी (OBC) राहणार आहे. ओबीसी आरक्षण (OBC Reservation) काढताना, ज्या प्रभागांमध्ये दोन जागांवर आरक्षण आहे.

तसेच, चार सदस्यांचा प्रभाग आठ क्रमांक वगळता इतर प्रभागांसाठी आरक्षण सोडत काढली जाईल, अशी माहिती निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी दिली. (NMC Election 36 seats reserved for OBC Nashik Latest NMC Election News)

राज्यातील अठरा महापालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये इतर मागासवर्गीय अर्थात ओबीसी आरक्षणाचा मुद्दा गेल्या सहा- सात महिन्यांपासून गाजत आहे.

सर्वोच्च न्यायालयात बुधवारी (ता. २०) त्यावर अंतिम सुनावणी होऊन सत्तावीस टक्के आरक्षण देण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यापूर्वी प्रभागरचना अंतिम करणे, आरक्षण सोडत काढणे, मतदार याद्यांचे विभाजन याप्रमाणे निवडणुकीची तयारी प्रशासनाकडून सुरू आहे.

नव्या सूचनेनुसार महापालिकेत ओबीसी आरक्षण लागू होणार आहे. सातव्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी ४४ प्रभाग तयार करण्यात आले. यात तीन सदस्यांचे ४३, तर चार सदस्यांचा एक प्रभाग आहे. प्रभाग क्रमांक आठ हा चार सदस्यांचा घोषित करण्यात आला आहे, असे एकूण १३३ सदस्य आहेत.

NMC latest marathi news
Nashik : स्वीमिंग टँकमधून बुडून चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

२७ टक्के आरक्षणानुसार ३५.९१ सदस्य म्हणजेच पूर्णांकात ३६ जागा ओबीसीसाठी आरक्षित होतील. यापूर्वी अनुसूचित जाती प्रवर्गासाठी १९, अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी दहा जागांवर आरक्षण काढण्यात आले आहे.

ओबीसीसाठी ३६ जागा आरक्षित करण्यात आल्यानंतर खुल्या प्रवर्गासाठी ६८ जागा राहणार आहेत. त्यावर आरक्षण काढले जाणार नाही.

अनुसूचित जाती गटात पॉइंटनुसार एक जागा वाढल्याने ओबीसी प्रवर्गातदेखील एक जागा वाढू शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यानुसार ३६ ऐवजी ३७ ओबीसींच्या जागा राहण्याची शक्यता आहे.

दोन आरक्षणाचे प्रभाग सुरक्षित

ज्या प्रभागांमध्ये अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गासाठी दोन आरक्षण पडले आहे. त्या प्रभागात ओबीसी आरक्षण निघणार नाही. अनुसूचित जाती व जमातीचे दोन आरक्षण असलेले पाच प्रभाग आहे. यामध्ये प्रभाग क्रमांक सात, प्रभाग क्रमांक अकरा, प्रभाग क्रमांक २७, प्रभाग क्रमांक ३४ व प्रभाग क्रमांक ४४ चा समावेश आहे.

३८ प्रभागांमध्ये आरक्षण सोडत

४४ प्रभागांपैकी पाच प्रभागांमध्ये दोन जागांवर आरक्षण असल्याने ते वगळल्यास ३९ प्रभाग शिल्लक राहतात. ३६ जागांवर ओबीसी आरक्षण द्यावे लागणार आहे. त्यातही पन्नास टक्के महिलांसाठी आरक्षण द्यावे लागेल.

त्यानुसार महिला व पुरुष, असे प्रत्येकी १८ आरक्षण काढावे लागतील. प्रभाग क्रमांक आठ चार सदस्यांचा असल्याने तेथे ओबीसी महिला व एक पुरुष आरक्षण राहील. त्यानंतर उर्वरित ३८ प्रभागांमध्ये ओबीसींच्या ३४ जागांसाठी आरक्षण काढले जाईल.

‘अ‘ गटाला प्राधान्य, महिनाअखेर सोडत

ओबीसी आरक्षण काढताना आतापर्यंत सुमोटो प्रथम महिला प्रवर्गाचे आरक्षण काढण्यात आले आहे. यंदाही तीच पद्धती वापरल्यास त्यानुसार ३८ प्रभागांमध्ये १७ महिलांचे आरक्षण काढताना अ, ब व क पैकी अ वर्गात आरक्षण काढले जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. जुलैअखेर सोडत निघण्याची शक्यता आहे. सोडत कशी काढावी यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाकडून सूचना प्राप्त होतील. थेट पद्धतीने किंवा सोडतीद्वारे हे आयोगाच्या सूचनेवरून स्पष्ट होईल.

NMC latest marathi news
आदिवासी महिलांची बल्ल्यावरुन पाण्यासाठी पुन्हा रोजची जीवघेणी कसरत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()