NMC News : सातव्या वेतन आयोगाच्या वेतन फरकाच्या तिसऱ्या व चौथ्या हप्त्याची रक्कम, दिवाळी सानुग्रह अनुदानासाठी महापालिका कर्मचारी ऐन दिवाळी संपाचे हत्यार उपसण्याची तयारी करत आहे.
म्युनिसिपल कर्मचारी सेनेच्या मंगळवारी (ता. ३) झालेल्या बैठकीत बुधवारी (ता. ४) आयुक्तांकडे चौदा दिवसांची संपाची नोटीस सुपूर्द केली जाणार आहे.
चौदा दिवसात मागण्या मान्य न झाल्यास संप निश्चित करणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष व शिवसेनेच्या ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी सांगितले. (NMC employees prepare for strike 14 days notice to be given to Commissioner today nashik)
सातव्या वेतन आयोग वेतन फरकाचा तिसरा व चौथा हप्ता अदा करावा, दिवाळी सानुग्रह अनुदान द्यावे, अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित पदोन्नतीचा प्रश्न मार्गी लावावा, कर्मचाऱ्यांचे बेकायदेशीर निलंबन रद्द करावे, तांत्रिक संवर्गात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना अतांत्रिक स्वरूपाचे काम देऊ नये,
काश्यपी प्रकल्पग्रस्तांमधील उर्वरित २५ कर्मचाऱ्यांनाही वेतनश्रेणी लागू करावी, सफाई कर्मचाऱ्यांना हेल्मेट, गमबूट, पाटी, फावडे, हातगाडे, झाडू, केरभरणी आदी साहित्य पुरवावे आदी प्रलंबित मागण्यांसाठी म्युनिसिपल कर्मचारी सेनेने आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांना यापूर्वी निवेदन दिले होते.
त्यानंतर आयुक्तांनी सकारात्मक भूमिका घेत लेखा विभागाला आदेशित केले. परंतु वेतन आयोगाचे एकरक्कमी हप्ते अदा केल्यास दिवाळीत ठेकेदारांचे देयके देण्यास रक्कम शिल्लक राहणार नसल्याचे अहवालात नमुद करण्यात आले.
त्याशिवाय अन्य मागण्यादेखील प्रलंबित असल्याने म्युनिसिपल कर्मचारी-कामगार सेनेने आक्रमक भूमिका घेत प्रशासनाच्या भूमिकेविरोधात संपाचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी म्युनिसिपल सेनेची बैठक महापालिका मुख्यालयात झाली. यात संप पुकारण्याचा व त्यापूर्वी नोटीस बजावण्याचा निर्णय घेण्यात आला.
"एकरक्कमी वेतन फरकाचा हप्ता मिळावा तसेच अन्य प्रलंबित मागण्यांसाठी निवेदन देवूनही प्रतिसाद मिळतं नसल्याने नाइलाजाने संपाची नोटीस बजवावी लागतं आहे. मागण्या मान्य न झाल्यास संप पुकारला जाणार आहे."- सुधाकर बडगुजर, अध्यक्ष, म्युनिसिपल कर्मचारी सेना.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.