NMC News: महापालिकेची अतिक्रमण कारवाई; अन् अतिक्रमण विभागाच्या हाती भोपळा

Tapri holders removing encroachment by themselves after the arrival of municipal encroachment team
Tapri holders removing encroachment by themselves after the arrival of municipal encroachment teamesakal
Updated on

NMC News : महापालिका अतिक्रमण पथकाने मंगळवारी (ता. १०) सकाळी तीन ठिकाणी कारवाई केली.

सहा विभागाचे कर्मचारी व पोलिस अधिकारी असा मोठा फौजफाटा आल्यामुळे मोठी कारवाई होईल असे वाटले, मात्र खोदा पहाड, निकाला चुहा अशी कारवाई झाल्याची चर्चा होती. (NMC Encroachment Action And pumpkin in hands of encroachment department nashik)

नाशिक रोडला अतिक्रमण हटविण्यासाठी महापालिका प्रशासनाने पहाटेपासून तयारी केली. त्यासाठी सहा विभागाच्या सहा गाड्या व ३५ कर्मचारी, एक जेसीबी, दोन टॅक्टर व अनेक दिवसांनी कारवाईसाठी मिळालेला पोलिस बंदोबस्त अधिकारी, कर्मचारी असा फौजफाटा सकाळी सातच्या सुमारास नाशिक रोडला पोचला.

मोठी कारवाई होईल असे वाटले. मात्र पथक यांनी मशीद रोडवरील दिव्या शोरूमसमोर व देवी मंदिर उद्यानालगत असलेल्या आठ टपऱ्या काढत असताना टपरीधारकांनी स्वतः टपरी काढून घेतल्या.

त्यानंतर सुभाष रोड येथील नैसर्गिक नाल्यावरील दोन टपऱ्या काढताना मालकांनी त्या स्वतः काढल्या, मात्र महापालिकेने फक्त तेथील ओटे फोडले. मुक्तिधाम येथील हॉकर्स झोनमधील एक टपरीधारकाने वाढीव टपरी ठेवल्याने ती मंजूर आहे, ती ठेवण्यात आली.

Tapri holders removing encroachment by themselves after the arrival of municipal encroachment team
Nashik News: आयुक्तालय हद्दीत शहरात 26 ऑक्टोबरपर्यंत मनाई आदेश

वडनेर गावातील हनुमान मंदिराजवळील महापालिकेच्या जागेत होत असलेले बांधकाम पाडून ते ताब्यात घेण्याचे काम दुपारपर्यंत सुरू होते. एकही अतिक्रमण सुद्धा महापालिकेच्या हाती लागले नाही.

नाशिक रोडला वास्को चौकात देवी मंदिराच्या सभोवती टपऱ्यांचे अतिक्रमण आहेत. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज चौक, देवी चौकाकडे जाणारा रस्ता, मुक्तिधामशेजारी सोमाणी उद्यानालगत पावभाजी, खाद्यपदार्थ विक्रेत्यांचे मोठे अतिक्रमण आहेत.

तसेच रेजिमेंटल समोरील गायकवाड मळ्याकडे जाणारा रस्तावर किराणा व स्वीट्स दुकानासमोर पार्किंग जागेवर व्यवसाय थाटल्याने रस्तावर वाहनांची पार्किंगमुळे वाहतूक कोंडी होते. त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत.

Tapri holders removing encroachment by themselves after the arrival of municipal encroachment team
NMC News: सौर दिव्यांसाठी 2 कोटीचा निधी! 2 जलतरण तलावांवर सौरऊर्जा पॅनल उभारणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.