NMC Hoarding Audit : शहरात 6 होर्डिंग जीवघेणे; दुरुस्तीसाठी 8 दिवसांची मुदत

NMC on Unauthorized Hoardings
NMC on Unauthorized Hoardingsesakal
Updated on

NMC Hoarding Audit : पावसाळ्यापूर्वी शहरातील खासगी एजन्सीकडून ८२३ होर्डिंग्जचे मजबुती प्रमाणपत्र ऑडिट पूर्ण करून घेतले. त्यात सहा होर्डिंग्जचे स्ट्रक्चर धोकादायक असल्याचे पुढे आहे.

त्यामुळे जीवघेणे होर्डिंग्ज दुरुस्तीसाठी महापालिकेने संबंधितांना आठ दिवसांची मुदत दिली आहे. (NMC Hoarding Audit 6 hoardings in city fatal 8 days for correction nashik)

NMC on Unauthorized Hoardings
NMC Hoarding Audit : शहरात धोकादायक होर्डिंगची शोधमोहीम; 3 संस्थांवर जबाबदारी

तर २४० होर्डिंग स्ट्रक्चरच्या डागडुजीची नितांत गरज असल्याचे सांगण्यात आले. पावसाळ्याचे दिवस असल्याने वादळी वारे व पावसामुळे होर्डिगमुळे दुर्घटनेची शक्यता गृहीत धरून होर्डिंग धारकांना दरवर्षी स्थिरता प्रमाणपत्र (स्टॅबिलिटी सर्टिफिकेट) महापालिकेच्या विविध कर विभागाला सादर करावी लागते.

कर संकलन विभागाने प्रमाणपत्र सादर करण्यासाठी ३० जूनचा अल्टिमेटम दिला. कारवाईचा इशारा देताच ८२३ होर्डिगचे स्थिरता तपासणी करण्यात आली. मात्र, संबंधित एजन्सीने तपासणीत कमी धोकादायक, धोकादायक अशी सविस्तर माहिती मागविली होती.

त्यात, सहा होर्डिंग्ज स्ट्रक्चर धोकादायक असून, कधीही कोसळून दुर्घटनेची भीती व्यक्त करण्यात आली. तर २४० होर्डिंग्जला किरकोळ डागडुजीची गरज व्यक्त करण्यात आली आहे.

NMC on Unauthorized Hoardings
NMC Hoarding Audit : 6 धोकादायक होर्डिंग हटविण्याच्या सूचना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.