NMC Homeless Shelter Survey : महापालिकेकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये शहरांमध्ये ८१४ बेघर आढळून आले असून त्यांच्यासाठी चार निवारा केंद्राची उभारणी केली जाणार आहे.
नाशिक रोड विभागात चेहेडी येथे सर्वात मोठे निवारा केंद्र होणार असून येथे ४८० बेघर नागरिकांना सामावून घेतले जाणार आहे. (NMC Homeless Shelter Survey finds 814 homeless in cities largest shelter center to be set up at nashik road)
केंद्र सरकारच्या दीनदयाळ अंत्योदय योजना व राष्ट्रीय नागरिक उपजीविका अभियानांतर्गत बेघर नागरिकांना निवारा केंद्र उपलब्ध करून देण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थेवर निश्चित करण्यात आली आहे.
त्याअनुषंगाने नाशिक महापालिका हद्दीमध्ये सर्वेक्षण करण्यात आले. सर्वेक्षणाअंती शहरांमध्ये ८९४ बेघर लाभार्थ्यांची नोंदणी झाली. तपासणीनंतर ८१४ बेघर निश्चित करण्यात आले. नियमानुसार १ लाख लोकसंख्येमागे १०० बेघर क्षमेतेचे एक निवारा केंद्र बांधणे आवश्यक आहे.
नाशिक शहराची लोकसंख्या २०११ नुसार १४ लाख ८५००० असल्याने शहरात १५ निवारा केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. पंचवटी तपोवन येथील नाशिक शिवारातील सर्वे क्रमांक २८८ मध्ये साधूग्राम येथील जागेत १८० बेघर क्षमता असलेले कायमस्वरूपी निवारा केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. तेथील बांधकाम पूर्ण झाले आहे.
त्यानंतर महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून महापालिकेच्या स्वमालकीच्या चार जागांवर निवारा केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याअनुषंगाने सविस्तर प्रकल्प अहवाल ऑक्टोबर २०२२ मध्ये राज्य प्रकल्प समितीकडे सादर करण्यात आला.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
त्यानंतर या प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यानंतर महासभेवर मंजुरीसाठी विषय ठेवण्यात आला. त्याअनुषंगाने महासभेने मंजुरी दिली असून, २७ कोटी आठ लाख रुपये खर्च करून निवारा केंद्र उभारले जाणार आहे.
इतर भागातही केंद्र होणार
चेहेडी शिवारातील सर्वे क्रमांक २५ मध्ये ट्रक टर्मिनसच्या आरक्षित जागेत २२० क्षमतेचे बेघर निवारा केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु ट्रक टर्मिनस जागेवर महामेट्रो तसेच सिटीलिंक बस डेपो होणार असल्याने ती जागा रद्द करून नाशिक रोड रेल्वे स्टेशनच्या बाजूला असलेल्या विष्णूनगरमधील सर्वे क्रमांक २३२ च्या आरक्षित जागेत ४८० क्षमेतेचे बेघर निवारा केंद्र उभारले जाणार आहे.
त्याशिवाय पंचवटी विभागातील नाशिक शिवारातील सर्वे क्रमांक २८८ मध्ये ४६ क्षमतेचे बेघर निवारा केंद्र उभारले जाणार आहे. सातपूर विभागातील सर्वे क्रमांक ५३१, ५३२ व ५३३ मध्ये १०२ क्षमेतेचे निवारा केंद्र बांधले जाणार आहे.
त्या व्यतिरिक्त पूर्व विभागातील वडाळा गावठाणातील सर्वे क्रमांक ८१ मधील आरक्षित जागेत २१३ क्षमेतेचे बेघर निवारा केंद्र उभारले जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.