Nashik NMC News : मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे घर व पाणीपट्टी देयके नागरिकांना वेळेच्या आत मिळत नाही. त्यातून थकबाकी तर होतेच त्याशिवाय कारवाईलादेखील नागरिकांना सामोरे जावे लागते.
त्या पार्श्वभूमीवर आता नागरिकांना व्हॉट्स ॲप माध्यमातून घरपट्टीची लिंक पाठवून देयके दिली जाणार आहे. (NMC News Housing payments to be received on WhatsApp Allotment of water bill payments through private organization nashik news)
जीएसटी पाठोपाठ महापालिकेला घरपट्टीच्या माध्यमातून उत्पन्न प्राप्त होते. परंतु नाशिक महापालिकेमध्ये मनुष्यबळाची मोठ्या प्रमाणात कमतरता आहे. घरपट्टी विभागात जवळपास पावणेचार लाख मिळकतींना घरपट्टी देयकांची वाटप करण्यासाठी अवघे 80 कर्मचारी आहेत.
या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून वर्षातून दोनदा घरपट्टीची देयके पोचविणे अशक्य आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाकडून ऑनलाइन घरपट्टी भरणा व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. परंतु सर्वच नागरिक ऑनलाइन पद्धतीने घरपट्टीचा भरणा करतात, असे नाही.
अनेक नागरिकांना अजूनही माहिती व तंत्रज्ञानाच्या अभावामुळे ऑफलाइन पद्धतीनेच घरपट्टी भरावी लागते. ही संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे नागरिकांच्या हातात घरपट्टीची देयके देण्याशिवाय पर्याय नाही.
हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत
महापालिकेकडून दरवर्षी एप्रिल, मे व जून या तीन महिन्यांसाठी घरपट्टीची सवलत दिली जाते. हा काळ वगळता शेवटच्या म्हणजे आर्थिक वर्षाच्या शेवटच्या मार्च महिन्यात घरपट्टी वसुलीसाठी तगादा लावला जातो.
परंतु पूर्ण क्षमेतेने घरपट्टी वसूल होत नाही. अनेकदा कर्मचाऱ्यांवरच कारवाई करण्याची वेळ येते. आता व्हॉट्स ॲपवर लिंक पाठवली जाणार असून, त्यावर क्लिक केल्यास करदात्यांना घरपट्टीचे देयक दिसेल. अशी माहिती कर उपायुक्त अर्चना तांबे यांनी दिली.
खासगीकरणातून वाटप
घरपट्टी प्रमाणेच पाणीपट्टी देयकेदेखील नागरिकांना प्राप्त होत नाही. घरपट्टी वसुलीसाठी व्हॉट्स ॲप माध्यमातून देयक पाठविले जात असतानाच पाणीपट्टीचे देयक वाटप करण्यासाठी मात्र खासगी एजन्सी नियुक्त केली जाणार आहे. खासगी एजन्सीच्या माध्यमातून नागरिकांच्या हातात पाणीपट्टीची देयके दिली जातील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.