NMC News : तांत्रिक सर्वेक्षणासाठी IIT पवईची मदत; मुंबई नाका परिसरात अंडरपास

Mumbai Naka
Mumbai Nakaesakal
Updated on

NMC News : मुंबई नाका सर्कल येथील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महापालिकेकडून आता अन्य पर्यायांचा अभ्यास करण्यासाठी आयआयटी मुंबईच्या वाहतूक अभियांत्रिकी विभागाची मदत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या संस्थेमार्फत वाहतूक सर्वेक्षण करून त्यानंतर अहवालातील तरतुदींची अंमलबजावणी केली जाणार आहे. प्रामुख्याने मुंबई नाका येथे अंडरपास तयार करण्यासंदर्भात सर्वेक्षण केले जाणार आहे. (NMC IIT Powai Help for Technical Survey Underpass in Mumbai Naka area nashik)

शहरात मुंबई नाका, एबीबी सर्कल, द्वारका सर्कल, उपनगर नाका, काठे गल्ली सिग्नल, काट्या मारुती पोलिस चौकी, रविवार कारंजा, शालिमार चौक, जेहान सर्कल या महत्त्वाच्या ठिकाणी वाहतूक ठप्प होते.

मुंबई नाका येथे सध्या वाहतुकीचा प्रश्न जटिल झाला आहे. रस्ते वाहतूक समिती बैठकीत मुंबई नाका परिसरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पर्याय सुचविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी रॅलीएंट या कंपनीकडून सर्वेक्षण करण्यात आले.

कंपनीकडून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या सिग्नल बसविणे किंवा भुयारी मार्गाचा पर्याय सुचविण्यात आला. त्याचबरोबर सिग्नलचा घेर कमी करण्याचा प्रस्तावदेखील सुचविण्यात आला. परंतु राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मुंबई नाका सर्कलचा घेर कमी करण्यास विरोध दर्शविला आहे.

सर्कलचा दोन तृतीयांश भाग महापालिकेच्या हद्दीत असल्याने त्याअनुषंगाने महापालिका व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अंडरपास तयार करण्याचा पर्याय सुचविला आहे.

या पर्यायाचा अभ्यास करण्यासाठी महापालिकेने आयआयटी मुंबईच्या वाहतूक अभियांत्रिकी विभागामार्फत वाहतूक सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Mumbai Naka
Nashik DPC: पुरातत्त्वला जिल्ह्यात दर वर्षी 20 कोटी! जिल्हा नियोजन समिती वार्षिक आराखड्यात 3 टक्क्यांची तरतूद

दोन संस्थांकडे मालकी

मुंबई नाका सर्कल देखभाल दुरुस्ती महापालिकेकडे असले तरी सर्कलचा काही भाग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे आहे. तर, जवळपास एक तृतीयांश भाग हा महापालिकेच्या मालकीकडे आहे.

येथे सुधारणा करताना कुठल्यातरी एकाच मालकीच्या जागेत या सुधारणांचे अंमलबजावणी करावी लागणार आहे. ही प्रमुख तांत्रिक अडचण आहे.

अंडरपास टाकल्यास महापालिकेच्या हद्दीतून जाणार असल्याने या समस्येवर तोडगा निघू शकतो. त्याअनुषंगाने आयआयटीमार्फत सर्वेक्षण केले जाणार आहे.

या मुद्द्यांचा होणार अभ्यास

- वाहनांचे आगमन व निर्गमन

- ट्रॅफिक काउंट

- एकेरी वाहतूक

- महामार्ग बसस्थानकातील बसचा मार्ग बदलणे.

- अंडरपास तयार करणे.

Mumbai Naka
Nashik Revenue Week: महसूल सप्ताहानिमित्ताने नोंदणी मुद्रांक विभागाचे विविध उपक्रम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.