वासननगरमध्ये पाण्यासाठी महिलांचा ठिय्या; NMC ॲक्शन मोडमध्ये

nashik nmc
nashik nmcesakal
Updated on

इंदिरानगर (जि. नाशिक) : वासननगर भागात पुन्हा एकदा पाण्याची समस्या उद्भवल्याने संतप्त महिलांनी मंगळवारी (ता. ५) ठिय्या दिला. शिवसैनिक रवींद्र गामणे यांच्यासह रस्त्यावर उतरलेल्या महिलांनी तीव्र भावना व्यक्त करण्यास सुरवात केली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून श्री. गामणे यांनी शिवसेना (Shivsena) महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांना ही माहिती देताच त्यांनी तातडीने येथे पोचत थेट आयुक्त रमेश पवार (NMC Commissioner Ram Pawar) यांच्याशी चर्चा करून त्यांना परिस्थितीचे गांभीर्य सांगितले. त्यामुळे महापालिकेची (NMC) यंत्रणा हलली.

दहा मिनिटात कार्यकारी अभियंता रवींद्र धारणकर यांच्यासह पाणीपुरवठा विभागाचे अभियंता गोकूळ पगारे, तांत्रिक विभागाचे उपअभियंता अफसर खान, अभियंता रवींद्र घोडके, नाना गायकवाड आदींनी धाव घेतली. अधिकाऱ्यांकडे महिलांनी समस्या मांडली. अनेक दिवसांपासून प्रभाग ३१ मधील अभिनंदन लॉन्स, सरोदे अपार्टमेंट, साई श्रद्धा अपार्टमेंट, महालक्ष्मी रो हाऊसेस, रिया गार्डन, सरोदे संकुल, रिया पार्क, कृष्णा रो हाऊसेस आदी भागात कमी दाबाने होत असलेल्या पाणी पुरवठ्याने नागरिक त्रस्त आहेत.

nashik nmc
नाशिक : जिल्हा रुग्णालयात फिरणाऱ्या 'त्या' तीन बोगस डॉक्टरांना अटक

खालच्या मजल्यावर असणाऱ्या तळ टाक्यादेखील पुरेशा भरत नसल्याने अनेकांना विकत पाणी घेण्याची वेळ आली आहे. अधिकाऱ्यांना व्हिडिओ कॉलद्वारे उपस्थित महिला आणि त्या व्यक्त करत असलेल्या भावना बडगुजर यांनी ऐकवल्या. अधिकाऱ्यांनीदेखील तातडीने दखल घेऊन कायमस्वरूपी समस्येवर मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. दरम्यान, या भागात पाणीपुरवठा सुरू करून सर्व अधिकाऱ्यांनी त्यांच्या उपस्थितीत पाण्याचा दाब तपासला. वेळ पडल्यास मुकणे धरणातून पंपिंगची वेळ वाढवून ही समस्या कायमस्वरूपी मार्गी लावण्याचा निर्णय घेण्यात आला. मुळातच हा भाग उंच असल्याने येथे सामान्यपेक्षा जास्त दाबाची गरज असल्याचे अधिकाऱ्यांनी मान्य केले. दरम्यान, येत्या दोन दिवसात हा प्रश्न मार्गी लावा अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करू असा इशारा श्री. बडगुजर यांनी दिला आहे.

nashik nmc
तापमान घसरल्याने दिलासा मात्र खंडीत विजपुरवठ्यामुळे संताप

या वेळी हर्षद पवार, भारती पाटील, अनिता पाटील, ज्योती मुळे, हेमांगी पाटील, रत्ना विधाते, वंदना पाटील, अनुपमा चव्हाण, सोनी जाधव, मंगल चव्हाण, शालिनी गुप्ता, जागृती जोशी, राणी कुलकर्णी, राजश्री सोनवणे, सीताबाई देशमुख, स्नेहा साळुंके, वर्षा कुलकर्णी, संगीता चौधरी, ज्योती दळवी, शोभना जहागीरदार, विमल जळगावकर, मंदाकिनी पांडे, समाधान अहिरे, राजेंद्र जगताप आदी उपस्थित होते.

"मुकणे पाणी योजना मुख्यतः सिडको, पाथर्डी फाटा, इंदिरानगर या भागासाठी गृहीत धरली आहे. मुबलक पाणी असल्याने शहराच्या इतर भागात थेट गांधीनगरपर्यंत हे पाणी सध्या जात आहे. मात्र नियोजनाच्या अभावामुळे या भागात महिला त्रस्त आहेत. प्रशासनाने व्यवस्थित नियोजन करून पाणी वितरण केले तर समस्यांचा निपटारा होऊ शकतो."

- सुधाकर बडगुजर, महानगरप्रमुख, शिवसेना

"जोपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होत नाही, तोपर्यंत महापालिकेने आमच्याकडून पाणीपट्टी घेऊ नये. कित्येक दिवसांपासून या समस्येचा सामना करत आहोत. प्रशासनाने याकडे लक्ष घालणे गरजेचे आहे."

- भारती पाटील, स्थानिक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()